-
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून अनेक जण प्रसिद्धीझोतात आले. त्यापैकी एक नाव म्हणजे छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडे.
-
घनश्यामला अनेकदा त्याच्या कमी उंचीमुळे अपमान आणि ट्रोलिंग सहन करावं लागलं आहे. त्याबद्दल त्यानं अनेक मुलाखतींमधून सांगितलं आहे.
-
अशातच घनश्यामनं त्याला लहानपणापासून आजारपण असल्याचंही सांगितलं. घनश्यामला लहानपणापासून किडनी, यकृत व फुप्फुसांसंबंधित आजार आहेत.
-
याबद्दल तो म्हणाला, “मी सहा वर्षांचा होईपर्यंत हॉस्पिटलमध्येच होतो. कारण- मला जन्मत:च काही त्रास होता. मला यकृत आणि किडनीचा त्रास अजूनही आहे.”
-
यापुढे तो म्हणतो, “माझी उंची कमी असल्यामुळे गावी मला डावललं जायचं; मला लोकांनी स्वीकारलं नसलं; तरी माझ्या आई-वडिलांनी माझा स्वीकार केला.”
-
यानंतर घन:श्याम म्हणाला, “कमी ऊंचीबद्दल डॉक्टरांना विचारलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, मला आनुवंशिकतेचा त्रास आहे. तेव्हाच मला थायरॉईडचा त्रास होता.”
-
यानंतर त्याने सांगितलं, “माझ्या यकृत व फुप्फुसांना सूज आहे. मी आजही इंजेक्शन घेतो. कारण- माझं रक्त आपोआप तयार होत नाही. रक्त शुद्ध करण्यासाठी मला इंजेक्शन घ्यावं लागतं.”
-
दरम्यान, घनश्यामच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो सध्या स्टार प्रवाहवरील ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
तसंच घनश्याम सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियाद्वारे तो काही राजकीय आणि सामाजिक विषयांवर व्यक्त होताना दिसतो.
छोटा पुढारीला जन्मापासून किडनी अन् फुफ्फुसांचा त्रास, कमी उंचीचं आहे ‘हे’ कारण…; आजारपणाबद्दल झाला व्यक्त
जन्मापासून लिव्हर, फुफ्फुस आणि किडनीचा त्रास…; छोटा पुढारी आजारपणाबद्दल झाला व्यक्त; कमी उंचीचंही सांगितलं कारण
Web Title: Ghanshyam darwade chhota pudhari shares he struggles with kidney liver and lung issues ssm 00