-
एकता कपूर पुन्हा एकदा आपल्या आयकॉनिक मालिकेचा दुसरा सीझन घेऊन येत आहे. यावेळीही कथा पारंपरिक मूल्यांभोवती, पण नव्या साच्यात गुंफली जाईल. चला, पाहूया कोणकोणते कलाकार परत येत आहेत आणि काय आहे त्यांची भूमिका!
-
अमर उपाध्याय – मिहीर पुन्हा रंगमंचावर ‘मिहीर’ या भूमिकेने घराघरांत प्रसिद्ध झालेला अमर उपाध्याय पुन्हा त्या झोतात येणार आहे. नव्या कथानकात त्याचा लूक अधिक परिपक्व आणि प्रभावी असणार आहे.
-
रोनित रॉय यांचंही पुनरागमन दुसऱ्या मिहीरच्या रूपात गाजलेले रोनित रॉयही या नव्या सीझनमध्ये दिसणार आहेत. त्यांच्या एन्ट्रीमुळे कथानकात ट्विस्ट येणार यात शंका नाही!
-
अमन वर्मा – शांत पण परिणामकारक अभिनेता अमन वर्मा पुन्हा एकदा शांत, पण कथेला वळण देणाऱ्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांचा स्क्रीन प्रेझेन्सही महत्त्वाचा ठरणार आहे.
-
अली असगर – विनोदी तडका कायम प्रेक्षकांचे लाडके अली असगर याही पर्वात असतील. हलकंफुलकं वातावरण तयार करणारा त्यांचा अंदाज यावेळीही हसवून जाईल.
-
हितेन तेजवानी – गहनतेची छटा हितेन तेजवानी यांची व्यक्तिरेखा यावेळी प्रगल्भ आणि अर्थपूर्ण असेल. त्यांच्या भूमिकेच्या माध्यमातून कथेला खोलवर जाण्याची संधी मिळेल.
-
जुन्या टीमसोबत नवं ट्विस्ट ही मालिका फक्त परतफेर नाही, तर नव्या काळाशी जुळणारी गोष्ट असेल. कथा, संवाद आणि सादरीकरण सर्व काही अपग्रेड केलं जात आहे.
-
प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला! या मालिकेच्या पहिल्या सीझनने जसा इतिहास घडवला, तसा प्रभाव दुसऱ्या सीझनमध्ये होईल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ नव्या रंगात परतणार; हे कलाकार झळकणार नव्या रूपात! पाहा फोटो
एकेकाळी घराघरांत पोहोचलेली ही मालिका आता नव्या पिढीसाठी नव्या अंदाजात तयार झाली आहे. मिहीर, पायल, अमन वर्मा यांसारखे कलाकार पुन्हा भेटीस येणार आहेत, तेही दमदार भूमिकेसह.
Web Title: Kyunki saas bhi kabhi bahu thi season two ekta kapoor tv serial old cast comeback new look svk 05