-
अभिनेत्री तमन्ना भाटियाने (tammana bhatia) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहे.
-
या फोटोंमध्ये ती पिवळ्या रंगाच्या ऑफ-शोल्डर ( off- shoulder) गाऊनमध्ये अतिशय देखणी आणि उठावदार दिसत आहे.
-
हा लूक तिने फॅशन डिझायनर (designer)मनीष मल्होत्रा यांच्या ‘INAYA’ कलेक्शनसाठी केला होता.
-
“INAYA is pure poetry” असं तिने मनीष मल्होत्राचा उल्लेख करत तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
-
या फोटोंमध्ये तमन्नाचा कॉन्फिडंट (confident) पोझ, आकर्षक मेकअप आणि स्टायलिश हेअरस्टाईलने विशेष लक्ष वेधलं आहे.
-
तमन्ना भाटिया ही दक्षिणेतील आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.
-
‘बाहुबली’, ‘एंटरटेनमेंट’, ‘एफ3’ अशा यशस्वी चित्रपटांमध्ये काम करून तिने अभिनय क्षेत्रात आपली खास ओळख निर्माण केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तमन्ना भाटिया/ इंस्टाग्राम)
Photos: पिवळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये तमन्ना भाटियाचे ग्लॅमरस फोटोशूट
तमन्ना भाटियाने मनीष मल्होत्राच्या ‘INAYA’ कलेक्शनसाठी परिधान केलेला हा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर चांगलाच लक्ष वेधून घेत आहे. झगमगत्या गाऊनमधील तिचा आत्मविश्वासपूर्ण अंदाज आणि सौंदर्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
Web Title: Actress tamannaah bhatia glamorous look in manish malhotra inaya collection svk 05