• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sankarshan karhade shares photo with shreyas talpade majhi tujhi reshimgath serial fame duo ssm

‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या समीर-यशचं रियुनियन, संकर्षण कऱ्हाडेने शेअर केले खास फोटो

संकर्षण कऱ्हाडेने शेअर केले श्रेयस तळपदेबरोबरचे खास फोटो, दोघांच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

July 30, 2025 23:30 IST
Follow Us
  • ‘झी मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका.
    1/9

    ‘झी मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका.

  • 2/9

    अभिनेता श्रेयस तळपदे व अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

  • 3/9

    मालिकेत श्रेयस तळपदे व प्रार्थना बेहेरे यांच्यासह अभिनेता संकर्षण कऱ्हाडेसुद्धा मुख्य भूमिकेत होता.

  • 4/9

    या मालिकेतील यश (श्रेयस तळपदे) व नेहा (प्रार्थना बेहेरे) ही जोडी जितकी लोकप्रिय होती, तितकीच लोकप्रिय यश व समीरची (संकर्षण कऱ्हाडे) जोडी सुद्धा प्रेक्षकांची लाडकी होती.

  • 5/9

    यश व समीरची मैत्री खऱ्या आयुष्यातही तितकीच छान आहे. मालिका संपून चार वर्षे झाली असली तरी अजूनही दोघं कायम सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत असतात.

  • 6/9

    अशातच संकर्षणने पुन्हा एकदा त्याच्या खास मित्राबरोबरचा म्हणजेच श्रेयस तळपदेबरोबरचा खास फोटो शेअर केला आहे.

  • 7/9

    श्रेयस तळपदे संकर्षणचे नाटक बघण्यासाठी गेला होता. याचा खास फोटो संकर्षणने शेअर केलाय. “प्रयोग बघायला अपना भाई आया था” असं कॅप्शन देत त्याने हे फोटो शेअर केला आहे.

  • 8/9

    श्रेयससह त्याची पत्नी, अभिनेता सुमित राघवन आणि त्याची पत्नी चिन्मयीसुद्धा पोहोचले होते. (फोटो सौजन्य : संकर्षण कऱ्हाडे/श्रेयस तळपदे)

  • 9/9

    दरम्यान, संकर्षणचं ‘कुटुंब किर्रतन’ हे नाटक सध्या रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. त्याच्या नाटकाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Sankarshan karhade shares photo with shreyas talpade majhi tujhi reshimgath serial fame duo ssm 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.