-
मराठी अभिनेता प्रणव रावराणे आणि त्याची पत्नी व अभिनेत्री अमृता यांनी काही दिवसांपुर्वी ठाण्यात स्वत:चं नवं घर घेतलं.
-
प्रणव हा मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता असून त्याने अनेक मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
-
तर प्रणवची पत्नी अमृता रावराणेसुद्धा काही मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
-
काही दिवसांपुर्वी दोघांनी मिळून त्यांच्या नव्या घराचं स्वप्न साकार केलं. या नवीन घराबद्दल त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत
-
अमृताने तिच्या नवीन घरातील पूजेचा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता.
-
अमृताची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील सहअभिनेत्री श्वेता मेहंदळेनेसुद्धा या नवीन घराला भेट दिली होती
-
श्वेताने या प्रणव-अमृता यांच्याबरोबरचा खास फोटो शेअर करत ‘नव्या घरासाठी शुभेच्छा’ असं म्हटलं होतं.
-
त्याचबरोबर प्रणव-अमृता यांच्या एका मित्रानेसुद्धा नव्या घराबद्दल त्यांना भेटवस्तू देत शुभेच्छा दिल्या होत्या.
-
दरम्यान, अमृता-प्रणव यांच्या घराची नेमप्लेट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे (फोटो प्रणव-अमृता इन्स्टाग्राम)
लोकप्रिय मराठी जोडप्याने ठाण्यात घेतलंय स्वत:चं नवं घर, दारावरची नेमप्लेट आहे खूपच खास; पाहा फोटो
अभिनेता प्रणव आणि अभिनेत्री अमृता रावराणे यांनी ठाण्यात घेतलं नवीन घर, नेमप्लेटने वेधलं लक्ष
Web Title: Marathi actor pranav raorane and her wife amruta bought new home in thane see photos ssm 00