-
करीना कपूरचं डाएट, योगा आणि तिची ‘झिरो साईज फिगर’ हा एकेकाळी खूपच चर्चेचा विषय ठरला होता. बेबो दोन मुलांची आई आहे पण, वयाच्या चाळीशीत सुद्धा करीना डाएट आणि फिटनेसवर विशेष लक्ष केंद्रीत करते.
-
२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टशन’ चित्रपटासाठी करीनाने फिटनेसवर भरपूर मेहनत घेतली होती. गेल्या १८ वर्षांपासून मराठमोळ्या आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करीना डाएट फॉलो करतेय.
-
करीना सकाळी उठल्यावर सर्वप्रथम रात्री भिजवून ठेवलेले बदाम, मनुका, अंजीर खाते. त्यानंतर नाश्ता करताना पराठे किंवा पोहे खाते.
-
करीनाच्या दुपारच्या जेवणात डाळ-भाताचा समावेश असतो. संध्याकाळी बेबो क्वचित चीज टोस्ट खाते. अन्यथा आंब्याचा किंवा सीझनल फळांचा मिल्कशेक पिते.
-
रात्रीच्या जेवणासाठी बेबो पुलाव किंवा तूप घालून केलेली खिचडी खाते. आठवड्यातून पाच दिवस ती सहज खिचडी भात खाते, असं ऋजुता दिवेकरांनी सांगितलं.
-
शूटिंगदरम्यान, गरमागरम डाळ-भात सहज उपलब्ध असतो याशिवाय घरूनही सहज बनवून नेता येतो. त्यामुळे बेबो चपाती-भाजीपेक्षा सेटवर डाळभात नेणं जास्त सोयीचं समजते असंही ऋजुता यांनी नमूद केलं.
-
करीनाला खिचडी भात खूप आवडतो त्यामुळे आठवड्यातून चार ते पाच दिवस तिच्या जेवणात खिचडी भाताचा समावेश असतो.
-
करीना याबद्दल म्हणते, “डाळ-भात, खिचडी भात किंवा दहीभात यापेक्षा वेगळं मी काहीच खाऊ शकत नाही. मी आठवड्यातून पाच वेळाही खिचडी भात खाते…आवडीचं खाल्ल्यावरच माणूस आनंदी राहतो असं मला वाटतं. पण, हे सगळं जेवण मी रात्री नाहीतर संध्याकाळी ६:३० पर्यंत जेवते आणि रात्री ९:३० वाजता झोपते.”
-
दरम्यान, ‘टशन’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ‘झिरो साईज फिगर’साठी मेहनत घेत असतानाही आवर्जून मी पराठे खायचे असं करीनाने यावेळी सांगितलं. ( सर्व फोटो सौजन्य : करीना कपूर इन्स्टाग्राम )
१८ वर्षांपासून ‘बेबो’चा एकच Diet प्लॅन! करीना कपूरच्या मराठमोळ्या आहारतज्ज्ञ म्हणतात, “आठवड्याचे ५ दिवस ती…”
प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितली करीना कपूरची दिनचर्या, बेबोच्या डाएटविषयी जाणून घेऊयात…
Web Title: Kareena kapoor khan marathi dietician rujuta diwekar reveals her diet plan from 18 years sva 00