-
झी मराठीवर नुकतंच ‘चला हवा येऊ द्या’ या गाजलेल्या शोचं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
-
या नव्या पर्वात कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधवसह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेसुद्धा आहे.
-
गौरव मोरेसह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील निमिश कुलकर्णीसुद्धा ‘चला हवा येऊ द्या २’मध्ये सहभागी झाला आहे.
-
निमिश ‘चला हवा येऊ द्या २’मध्ये अभिनेत्याच्या भूमिकेत नाही, तर दिग्दर्शनाची भूमिका पार पाडत आहे, याबद्दल त्याने स्वत: सांगितलं होतं.
-
‘चला हवा येऊ द्या २’शोमधील दिग्दर्शनातील पदार्पणाबद्दल निमिशने अल्ट्रा मराठी बझशी संवाद साधला होता.
-
यावेळी त्याने ‘चला हवा येऊ द्या २’मध्ये मला दिग्दर्शन या क्षेत्रात काम करायची संधी मिळाली आणि मी ती संधी लगेच घेतली असं म्हटलं होतं.
-
तसंच “कॉलेजमध्ये असल्यापासूनच मला दिग्दर्शनात रस होता. त्यामुळे यात पुढे जाऊन काहीतरी करायचं हे डोक्यात होतं’ असंही म्हटलं होतं
-
दरम्यान, ‘हास्यजत्रा’मधील विनोदी स्किट्समधून निमिषने प्रेक्षकांना हासवण्याचं काम केलं आहे. त्यानंतर आता तो दिग्दर्शन करत आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
-
काही दिवसांपूर्वीच निमिशने एक खुशखबर दिली ती म्हणजे त्याच्या साखरपुड्याची. २५ जुलै २०२५ रोजी त्याचा कोमल भास्करबरोबर साखरपुडा पार पडला.
गौरव मोरेसह ‘हास्यजत्रा’मधील ‘हा’ अभिनेताही ‘चला हवा येऊ द्या’मध्ये झालाय सहभागी, स्वत:च केलेला खुलासा
‘चला हवा येऊ द्या’च्या दुसऱ्या पर्वात गौरव मोरेबरोबरच हास्यजत्रा फेम ‘या’ अभिनेत्याचीही झालीय एन्ट्री, पाहा…
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame nimish kulkarni also part of chala hawa yeu dya 2 with gaurav more ssm 00