-
९० च्या दशकात प्रदर्शित झालेले खास चित्रपट जे आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात, यातला पहिला चित्रपट आहे हम आपके हैं कौन (सर्व फोटो इंडियन एक्सप्रेस आणि जनसत्ता)
-
हम आपके हैं कौन? हा चित्रपट कौटुंबिक सिनेमा होता. माधुरी दीक्षित, सलमान खान यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. काही जणांनी या चित्रपटाला लग्नाची व्हिडीओ कॅसेटही म्हटलं. पण चित्रपटाने भरपूर कमाई केली आणि आजही हा चित्रपट लोकांना खूप आवडतो.
-
बॉबी देओल आणि ट्विंकल खन्ना या दोघांचाही पहिला चित्रपट म्हणजे बरसात. ही प्रेमकहाणीही लोकांना खूप भावली होती.
-
या यादीतला आणखी एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. हा चित्रपट आजही लोकांना आवडतो.
-
दिलवाले दुल्हनिया ले जाएंंगे चित्रपटात शाहरुख आणि काजोल यांची जोडी होती. यातली गाणीही लोकांना खूप आवडली होती.
-
दिल तो पागल है चित्रपटही लोकांना खूप आवडतो. या चित्रपटातली गाणी या चित्रपटाचा प्राण आहेत.
-
दिल तो पागल है हा प्रेम त्रिकोण होता. यात माधुरी दीक्षित, शाहरुख आणि करीश्मा कपूर यांच्या भूमिका आहेत.
-
कुछ कुछ होता है हा चित्रपटही लोकांच्या पसंतीस उतरला होता. काजोल, राणी मुखर्जी आणि शाहरुख यांच्या या सिनेमात भूमिका आहेत.
-
कुछ कुछ होता है चित्रपटातली गाणीही लोकांना खूप आवडली होती.
-
मोहरा हा चित्रपटही लोकांनी डोक्यावर घेतला होता. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि रविना टंडन यात प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटातलं टीप टीप बरसा पानी हे गाणं आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतं.
-
मोहरा चित्रपटात नसिरुद्दीन शाह खलनायकी भूमिकेत होते. त्यांची ही भूमिकाही लोकांना आवडली होती.
-
साजन हा चित्रपट संगम चित्रपटाचा रिमेक होता. साजन चित्रपटातली गाणीही लोकांना खूप भावली होती.
-
राजा हिंदुस्थानी हा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. यातलं परदेसी परदेसी गाणं तर आजही लोकांच्या ओठांवर येतं.
-
परदेस हा सुभाष घईंचा चित्रपट होता. यातून महिमा चौधरी ही स्टार बॉलिवूडला मिळाली. ही प्रेमकहाणीही लोकांना खूप भावली. यातलीही गाणी लोकांना खूप आवडली होती.
-
परदेस चित्रपटात शाहरुखचा संयत अभिनय लोकांना खूपच आवडला होता.
-
हम दिल दे चुके सनम या चित्रपटाचीही चर्चा अनेकदा होते. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला होता.
-
हम दिल दे चुके सनम चित्रपटाच्या सेटवरच सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं प्रेम फुललं होतं. या चित्रपटाचा विषय निघाला की या दोघांच्या केमिस्ट्रीची चर्चा होतेच.
बॉलिवूडचे हे खास चित्रपट आजही लोकांच्या मनावर करतात अधिराज्य, तुम्ही यातले किती पाहिलेत?
९० च्या दशकात आलेल्या या चित्रपटांचं गारुड अजूनही रसिकांच्या मनावर कायम आहे. तुम्ही पाहिलेत का हे चित्रपट?
Web Title: These special bollywood movies still rule the hearts of the people today how many of these have you seen scj