-
अभिनेता सैफ अली खानने नुकताच त्याचा ५५ वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या कुटुंबासह त्याने वाढदिवस साजरा केला. अभिनेत्री करीना कपूरने त्याच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
-
करीनाने सिंहाचा एक फोटो सैफच्या वाढदिवशी शेअर केला आहे. करीना म्हणते तू आमचा सिंह आहेस. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा (सर्व फोटो सौजन्य-करीना कपूर-खान, इन्स्टाग्राम पेज)
-
सैफ अली खानची बहीण सबाने सैफचा आणि तिचा फोटो पोस्ट केला आहे. (फोटो-सबा पतौडी, इन्स्टाग्राम पेज)
-
सबा पतौडीने सैफवर जो हल्ला झाला त्यावर हे सांगितलं की सैफ एखाद्या सिंहासारखा सामोरा झाला गेला. (फोटो-सबा पतौडी, इन्स्टाग्राम पेज)
-
सैफची बहीण म्हणते भाईजान तू एक उत्तम भाऊ आहेस. मी तुझं वर्णन नेमकं कसं करु? तू नंबर वन आहेस. (फोटो-सबा पतौडी, इन्स्टाग्राम पेज)
-
सबा पतौडी म्हणते सैफ हा खूप मेहनती आहे तसंच तो त्याच्या कुटुंबाची आणि त्याच्या मुलांचीही खूप काळजी घेतो.
-
सबा म्हणते, ईद असो किंवा दिवाळी सैफ कुटुंबाला पूर्ण वेळ देतो, सगळे आनंदी कसे राहतील याकडे त्याचं लक्ष असतं. -
इब्राहिम अली खानने सैफ बरोबर लहानपणीचा फोटो पोस्ट केला आहे. त्याने हॅपी बर्थ डे अब्बा असं या फोटोवर लिहिलं आहे.
-
सैफ अली खानची बहीण सोहाने या दोघांचा एक फोटो पोस्ट केला आहे. काही आठवणी अशा आहेत ज्या शब्दांत व्यक्त करता येणार नाहीत. माझ्या आयुष्यातले हे क्षण खूप आनंदाचे आहेत असंही सोहाने म्हटलं आहे.
“सैफ तू आमचा सिंह आहेस”, करीना कपूरची खास पोस्ट चर्चेत, इब्राहिम खान म्हणाला “लव्ह यू अब्बा!”
अभिनेता सैफ अली खानचा वाढदिवस नुकताच साजरा झाला, त्यानिमित्त तिने सैफबाबत पोस्ट लिहिली आहे.
Web Title: Kareena kapoor calls saif ali khan our lion ibrahim ali khan shares old photo with his abba scj