-
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेल्या १७ वर्षांपासून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. (फोटो सौजन्य: युट्यूब)
-
२००८ साली सुरू झालेल्या या मालिकेतील सर्वच पात्रे लोकप्रिय झाली आहेत. प्रत्येक पात्राचे काहीतरी वेगळे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे गोकुळधाम सोसायटीमध्ये गमतीजमती घडताना दिसतात. (फोटो सौजन्य: युट्यूब)
-
मालिकेतील जेठालाल व बबिताजी यांची केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांना आवडते.(फोटो सौजन्य: युट्यूब)
-
बबिताला खूश करण्यासाठी जेठालाल अनेक गोष्टी करताना दिसतो. (फोटो सौजन्य: युट्यूब)
-
जेठालाल ही भूमिका अभिनेते दिलीप जोशी यांनी साकारली असून मुनमुन दत्ताने बबिता ही भूमिका साकारली आहे. (फोटो सौजन्य:मुनमुन दत्ता इन्स्टाग्राम)
-
गेल्या १७ वर्षांपासून म्हणजे मालिकेच्या अगदी सुरुवातीपासून या दोन्ही कलाकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. (फोटो सौजन्य:मुनमुन दत्ता इन्स्टाग्राम)
-
पण, तुम्हाला माहितेय का? ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेआधीही दिलीप जोशी व मुनमुन दत्ताने स्क्रीन शेअर केली आहे. (फोटो सौजन्य:मुनमुन दत्ता इन्स्टाग्राम)
-
२००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘हम सब बाराती’ या मालिकेत त्यांनी एकत्र काम केले होते. (फोटो सौजन्य: दिलीप जोशी इन्स्टाग्राम)
-
दिलीप जोशींनी नाथू मेहता, तर मुनमुन दत्ताने मीठी ही भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य: दिलीप जोशी इन्स्टाग्राम)
जेठालाल व बबिताने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या आधी ‘या’ मालिकेत केलंय एकत्र काम
TMKOC fame Dilip Joshi and Munmun Dutta: दिलीप जोशी व मुनमुन दत्ता हे सध्या ‘तारक मेहता…’, या मालिकेत सध्या एकत्र काम करत आहे. मात्र, या मालिकेत काम करण्याआधीही त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे. त्यांनी नेमक्या कोणत्या मालिकेत एकत्र काम केलं आहे, हे जाणून घेऊ…
Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah fame jethalal aka dilip joshi and babita aka munmun dutta worked together before tmkoc know show name nsp