-
फराह खान तिचा स्वयंपाकी दिलीपसोबत बॉलीवूड कलाकारांच्या घराचा फेरफटका करताना दिसते आणि तो व्हिडीओ ती आपल्या यूट्यूबवर शेअर करते. प्रेक्षकांना हे व्हिडीओ खूप आवडतात. यावेळी फराहने अभिनेता चंकी पांडेच्या घराला भेट दिली आहे.
-
चंकी पांडे आपली पत्नी भावना पांडेसोबत मुंबईतील वांद्रे या ठिकाणी राहतो. फराहच्या ताज्या ब्लॉगमधून त्यांच्या घराची भव्यता पाहायला मिळाली. हे घर अक्षरशः एका राजवाड्याप्रमाणे दिसते आहे.
-
फराहने आपल्या ब्लॉगची सुरुवात घराच्या प्रवेशद्वारापासून केली. “चला मी तुम्हाला चंकी आणि भावना यांचं सुंदर घर दाखवते,” असे ती म्हणाली.
-
यानंतर फराहने जेवणाचा विभाग दाखवला. मजेशीर पद्धतीने चंकीला चिडवत ती म्हणाली, “ हे तेच टेबल आहे जिथे आपण सगळे बसतो, पण चंकी कधीच आम्हाला जेवायला घालत नाही.”
-
त्यानंतर फराहने काचेच्या भिंती आणि दरवाज्यांनी सजवलेला सूर्यप्रकाश भरून येणारा विभाग दाखवला. “हा चंकीचा सुंदर सनरूफ आहे, जिथे आपण खेळ खेळतो,” असे ती म्हणाली.
-
फराहने पुढे हिरव्यागार बागेचं दर्शन घडवलं. मोठमोठी झाडे, शांत कोपरे आणि वांद्रे येथील त्यांच्या घराचा हा सर्वात सुंदर भाग असल्याचे तिने सांगितले.
-
या वेळी फराहने दिलीपला विनोदी अंदाजात विचारले, “तुला वांद्र्यात असं जंगल कुठे दिसलं आहे का?” दिलीपने नाही असं उत्तर दिल्यावर फराह म्हणाली, “मग तू इथेच का राहत नाहीस?”
-
शेवटी फराह हसत म्हणाली, “चल दिलीप, थोडी ताजी हवा खाऊया, कारण चंकी आपल्याला काही खायला देणार नाही.”(Photo: Farah Khan/YouTube)
Photos: गार्डन एरिया ते सनरूफ कॉर्नर; वांद्रे येथील चंकी पांडेच्या आलिशान घराची खास झलक
Chunky Pandey house: फराह खानच्या ब्लॉगमध्ये चंकी पांडेच्या वांद्रे येथील घराची आतली भव्य झलक
Web Title: Bollywood actor chunky pandey bandra house tour photos farah khan youtube channel svk 05