-
‘तन्वी द ग्रेट’वर पडदा; पण अभिनयाच्या प्रवासाने दिली नवी ओळख
अनुपम खेर यांनी अलीकडेच एका मुलाखतीत ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाबद्दल खंत व्यक्त केली. चार वर्ष मेहनतीनंतर साकारलेला हा चित्रपट ‘सैयारा’च्या यशाखाली दबला; परंतु खेर यांच्या अभिनय प्रवासात असे अनेक टप्पे आहेत की, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवला.(Photo: Indian Express) -
‘सारांश’मधील बी. व्ही. प्रधान – पहिल्याच चित्रपटात मोठा ठसा
साल १९८४ मध्ये अनुपम खेर यांनी सारांश या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ६५ वर्षीय शिक्षक बी. व्ही. प्रधान यांची भूमिका त्यांनी इतक्या ताकदीने साकारली की, पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार मिळाला.(Photo: Indian Express) -
‘कर्मा’तील डॉ. मायकल डांग – खलनायकीचा प्रयोग यशस्वी
१९८६ मध्ये आलेल्या कर्मा या चित्रपटात त्यांनी डॉ. मायकल डांग या खलनायकाची भूमिका केली. दिलीप कुमार, अनिल कपूर, जैकी श्रॉफ यांच्यासोबत पडद्यावर तेवढ्याच ताकदीने उभे राहून प्रेक्षकांची दाद मिळवली.(Photo: Indian Express) -
‘इन्साफ की आवाज’मधील कैलाशनाथ – निगेटिव्ह भूमिकेतील प्रभाव
१९८६ मध्येच इन्साफ की आवाज या चित्रपटात अनुपम खेर यांनी कैलाशनाथ हे निगेटिव्ह पात्र साकारले. रेखा, अनिल कपूर, राज बब्बर अशा दमदार कलाकारांच्या सहवासात त्यांची भूमिका ठळकपणे उठून दिसली.(Photo: Indian Express) -
‘सत्यमेव जयते’तील अमर कौल – वकीलाच्या भूमिकेत प्रभावी
१९८७ मध्ये सत्यमेव जयते या चित्रपटात त्यांनी अॅडव्होकेट अमर कौल ही व्यक्तिरेखा साकारली. गंभीर वकिलाच्या भूमिकेत त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.(Photo: Indian Express) -
‘राम-लखन’मधील देओधर शास्त्री – विनोदी व निगेटिव्ह छटा एकत्र
१९८९ च्या सुपरहिट राम-लखनमध्ये माधुरी दीक्षितच्या वडिलांचा – देओधर शास्त्रीचा – रोल त्यांनी साकारला. विनोदी छटा असलेली ही भूमिका एकीकडे नकारात्मक बाजूसुद्धा दाखवत होती.(Photo: Indian Express) -
‘डॅडी’मधील आनंद सरीन – दूरदर्शनवर लोकप्रिय ठरलेली भूमिका
१९८९ मध्ये महेश भट्ट दिग्दर्शित डॅडी चित्रपटात अनुपम खेर यांनी आनंद सरीन हे पात्र साकारले. ही भूमिका इतकी प्रभावी ठरली की, त्यांना राष्ट्रीय पुरस्कारांत विशेष ज्युरीचा सन्मान मिळाला.(Photo: Indian Express) -
‘लम्हे’मधील प्रेम आनंद – प्रेक्षकांना खळखळून हसवणारी कामगिरी
१९९१ मध्ये आलेल्या ‘लम्हे‘मध्ये त्यांनी प्रेम आनंद या कॉमेडी पात्रातून प्रेक्षकांना खळखळून हसवले. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्तम विनोदी अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.(Photo: Indian Express) -
‘अ वेडनस-डे’मधील प्रकाश राठोड – दमदार पोलिस आयुक्त
२००८ मधील अ वेनस-डे या चित्रपटात ते प्रकाश राठोड या पोलिस आयुक्ताच्या भूमिकेत दिसले. गंभीर व सशक्त अभिनयासाठी त्यांना सर्वोत्तम सहायक अभिनेता पुरस्काराने गौरवण्यात आले.(Photo: Indian Express) -
‘द काश्मीर फाइल्स’मधील पुष्करनाथ पंडित – भावनिक आणि हृदयस्पर्शी भूमिका
२०२२ मध्ये विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाइल्समध्ये अनुपम खेर यांनी काश्मिरी पंडिताची भूमिका साकारली. कुटुंब गमावलेला व आपली मुळे गमावण्यास भाग पडलेला ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणून गेला.(Photo: Indian Express) -
अभिनय प्रवास – सातत्याने नवे प्रयोग, नवी ओळख
अनुपम खेर यांनी ४० वर्षांहून अधिक काळात शेकडो भूमिका साकारल्या. नायक, खलनायक, वडील, शिक्षक, कॉमेडी, गंभीर असे विविध पैलू त्यांनी पडद्यावर मांडले. त्यामुळेच भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचे स्थान आजही विशेष ठरते.(Photo: Indian Express)
खलनायकापासून वडिलांच्या भूमिकेपर्यंतचा अनुपम खेर यांचे गाजलेल्या ‘या’ ९ अविस्मरणीय भूमिका
Anupam Kher: चार दशकांपासून गाजवलेल्या अविस्मरणीय अभिनय प्रवासातील खास भूमिका
Web Title: Bollywood famous actor anupam kher best movie character list svk 05