-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एबीपी वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी विद्यमान राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ठाकरे बंधूंचं एकत्र येणं, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन, महायुतीमधील धुसफूस यावर त्यांनी रोखठोक उत्तरे दिली.
-
यावेळी त्यांना मुलाखतीच्या शेवटी रॅपिड फायर दरम्यान काही प्रश्न विचारण्यात आले. काही नेत्यांची नावे घेतल्यानंतर त्यांच्याबद्दल एका शब्दात किंवा वाक्यात उत्तर देण्यास सांगितलं असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशी काही उत्तरं दिली, ज्याची चर्चा आता होत आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, शरद पवार, अरविंद केजरीवाल, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कुणाल कामराबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता. यावरही त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्यामध्ये सर्वात कडक स्वभावाचे कोण आहेत? या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दोघांचे स्वभाव फार कडक नाहीत. पण अमित शाहांच्या तुलनेत पंतप्रधान मोदी जरा कडक आहेत.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे की अजित पवार, यांच्यापैकी कुणाबरोबर काम करायला अधिक आवडतं? यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दोघांबरोबरही काम करायला आवडतं.
-
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यापैकी सर्वात मोठे आव्हान कोण? यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांच्यासाठी मीच मोठे आव्हान आहे.
-
हिंदुत्त्वाचा पोस्टर बॉय कोण? फडणवीस की योगी आदित्यनाथ? यावर बोलताना ते म्हणाले की, हिंदुत्वाला पोस्टर बॉयची गरज नाही. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये चांगलं काम केलं आहे. उत्तर प्रदेश सारखा मोठा प्रदेश विकसित झाला नाही तर भारत विकसित होणार नाही. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली योगीजी चांगले काम करत आहे.
-
विरोधी पक्षातला आवडणारा नेता कोण?
विरोधी पक्षात अनेक चांगले नेते आहेत. पण काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकर मला खूप आवडायचे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. बुद्धिमान, सर्व गुण संपन्न असा नेता आपल्यातून लवकर निघून गेला. जर ते जिवंत असते तर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली असती, असेही ते म्हणाले. -
महाराष्ट्राचे राजकारण जर वेबसीरीज असती तर त्याला काय नाव दिले असते? असा एक मजेशीर प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘बदलते रिश्ते’
या उत्तरानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस आणि मुलाखतकार खळखळून हसले.
महाराष्ट्राच्या राजकारणावरील वेबसीरीजला काय ‘नाव’ देणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं जबरदस्त नाव
CM Devendra Fadnavis on Maharashtra Political Leaders: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका मुलाखती दरम्यान रॅपिड फायर अंतर्गत अनेक प्रश्न विचारण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकारणाची वेबसीरीज आल्यास त्याला काय नाव देणार? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी मजेशीर उत्तर दिले…
Web Title: Cm devendra fadnavis on rapid fire reaction suggest web series title on maharashtra politics viral interview kvg