-
मराठी अभिनेत्री विजया बाबर हिने झी मराठी पुरस्कार २०२५ नामांकन पार्टीत काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले. तिचा हा लूक अतिशय एलिगंट आणि आकर्षक दिसत होता.
-
रेड बॅकड्रॉपसमोर उभी राहिलेली विजया बाबर आणखीनच उठून दिसत होती. साधेपणासोबत ग्लॅमरस टच देणारा हा ड्रेस तिच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसला.
-
ड्रेसच्या खांद्यावर दिलेले बो-डिझाईन तिच्या लूकला वेगळेपण देत होते. त्याचबरोबर तळाशी असलेली फ्रिल डिझाईन या ड्रेसला अधिक ग्रेसफुल बनवीत होती.
-
विजया बाबर सध्या लोकप्रिय मालिकेत ‘कमळी’ ही मुख्य भूमिका साकारत आहे. मालिकेत ती निरागस, साधी मुलगी साकारते. मात्र, या पार्टीमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते भारावून गेले.
-
या खास प्रसंगी तिने मिनिमल दागिने आणि नैसर्गिक मेकअप निवडला होता. तिचा हा साधा, पण क्लासी अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला.
-
झी मराठी पुरस्कार २०२५ नामांकन पार्टीत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. पण, विजया बाबरने आपल्या स्टायलिश अवताराने वेगळीच छाप पाडली.
-
मालिकेतली कमळी आणि या पार्टीतील ग्लॅमरस लूक यातला विरोधाभास पाहून प्रेक्षकांना तिच्या बहुपदरी व्यक्तिमत्त्वाची जाणीव झाली.
-
(सर्व फोटो सौजन्य: विजया बाबर/इनस्टाग्राम)
Photos : झी मराठी पुरस्कार २०२५ नामांकन पार्टीत ‘कमळी’चा स्टायलिश अवतार
Marathi actress Vijaya Babar : ‘कमळी’ मालिकेतली साधी भूमिका आणि पार्टीतील स्टायलिश अवतार वेगळा ठरला चर्चेचा विषय
Web Title: Marathi kamali serial actress vijaya babar zee marathi awards 2025 nomination party look svk 05