-
मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे हिची नवीन पोस्ट सध्या चर्चेत आहे. उर्मिला येरवडा जेलमध्ये नवरात्र उत्सव साजरा करताना दिसली.
-
तिने निळ्या साडीमध्ये पारंपरिक लूकमध्ये फोटो शेअर केला आहे.
-
उत्सवात महिला कैद्यांसोबत हसणे आणि आनंद वाटण्याचा अनोखा अनुभव तिने अनुभवला.
-
हा अनुभव तिला खऱ्या अर्थाने उत्सवाची खरी ओळख समजून देणारा ठरला.
-
उर्मिला कोठारेने सोशल मीडियावर हा क्षण शेअर करत आभार व्यक्त केले आहेत.
-
कॅप्शन शेअर करत ती म्हणाली, ‘आज नवरात्र उत्सव येरवडा जेलच्या महिला कैद्यांसोबत साजरा करण्याचा योग आला. त्यांच्या हसण्यात शब्दांपेक्षा जास्त भावना होत्या… आणि तीच खरी उत्सवाची ओळख. माहेर प्रतिष्ठानचे मनापासून आभार; त्यांच्यामुळेच हा अनुभव जगता आला.’
-
कैद्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि आनंद पाहून अभिनेत्रीही भावूक झाली.
-
(सर्व फोटो सौजन्य: उर्मिला कानेटकर कोठारे/इनस्टाग्राम)
‘त्यांच्या हसण्यात शब्दांपेक्षा जास्त भावना होत्या… ‘येरवडा जेलच्या महिला कैद्यांसोबत उर्मिला कानेटकरने फोटो केले शेअर; म्हणाली…
अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे हिने येरवडा जेलच्या महिला कैद्यांसोबत नवरात्री साजरी केली. तिची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.
Web Title: Marathi actress urmila kanetkar kothare navratri celebration yervada jail woman prisoners svk 05