-
दीपिका पादुकोण ही आजच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांत यशस्वी व लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मॉडेलिंगपासून अभिनयापर्यंतचा तिचा प्रवास प्रेरणादायी मानला जातो.
-
जाहिरातीचा संदर्भ दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग अबू धाबी पर्यटनासाठी ‘मेरा सुकून’ या प्रमोशनल व्हिडीओत झळकले.
-
दीपिकाचा अबाया लूक या जाहिरातीत दीपिकाने शेख झायेद ग्रँड मशिदीला भेट दिली असून, त्या ठिकाणच्या ड्रेस कोडनुसार तिने अबाया परिधान केला होता.
-
चर्चेचा निष्कर्ष दीपिकाचा लूक एक साधा जाहिरातीचा भाग असला तरी त्यातून पुन्हा एकदा ’सेलिब्रिटींच्या वैयक्तिक निर्णयांवर समाजाचा न्याय’ या प्रश्नावर वाद सुरू झाला.
-
सोशल मीडियावर टीका दीपिकावर सोशल मीडियावर टीकांचा वर्षाव झाला. काहींनी म्हटलं, “महिलांच्या कपड्यांवरील स्वातंत्र्याची बाजू घेणारी दीपिका आता अबाया का घालते?”
-
‘माय चॉइस’ मोहिमेची आठवण २०१५ मध्ये दीपिकाने ‘My Choice’ मोहिमेत महिलांच्या स्वातंत्र्याचा प्रचार केला होता. काहींनी सध्याच्या कृतीला त्या मोहिमेच्या विरोधात असल्याचे म्हटले.
-
दांभिकतेचे आरोप टीकाकारांनी दीपिकेवर दांभिकतेचे आरोप केले, म्हणाले, “महिला स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी व्यक्ती धार्मिक प्रथा पाळून कशी वागते?”
-
दीपिका आणि वादांचा इतिहास दीपिका यापूर्वीही वादात सापडली आहे — दिल्लीतील JNU आंदोलनाच्या वेळी तिची उपस्थिती आणि ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यातील नारिंगी रंगाच्या बिकिनीमुळे ती चर्चेत आली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : दीपिका पादुकोण/इन्स्टाग्राम)
Photos : JNU आंदोलन ते अबाया लूक दीपिका पादुकोणचे लूकवरून निर्माण झालेले वाद
deepika padukone controversy : दीपिका पादुकोणच्या अबाया लूकवरून अबू धाबी जाहिरात वादग्रस्त
Web Title: Bollywood actress deepika padukone controversy abu dhabi ad abaya look explained svk 05