-
अभिनेत्री जेनेलिया देशमुखने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून नुकताच एक खास फोटो शेअर केला आहे. त्यामधील तिच्या पारंपरिक लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
-
जेनेलियाने परिधान केलेला हा मोहक पोशाख डिझायनर विक्रम फडणीस यांनी डिझाइन केलेला आहे. या उत्कृष्ट लेहंग्याने जेनेलियाचे सौंदर्य अधिकच खुलवले आहे.
-
जेनेलियाचा हा लेहंगा क्रीम (फिकट पिवळा व मरून लाल) रंगाच्या अप्रतिम संयोजनातून तयार झालेला आहे.
-
लेहंग्याच्या घेरदार स्कर्टवर मरून रंगाची नक्षी असून, फुलांच्या आणि पारंपरिक आकृतिबंधांनी संपूर्ण स्कर्ट भरलेला आहे. या रंगसंगतीमुळे तिला एक खास, रॉयल लूक मिळाला आहे.
-
या पारंपरिक लूकला पूर्णत्व देण्यासाठी जेनेलियाने ऑक्सिडाइज्ड (चांदीच्या रंगाचे) दागिने निवडले आहेत. तिच्या कानांतील मोठे झुमके सर्वांत जास्त लक्ष वेधून घेत आहेत. या झुमक्यांमध्ये बारीक कलाकुसर असून, ते तिच्या गळ्यातील दागिन्यांशी जुळणारे आहेत.
-
सोबतच तिने दोन्ही हातांमध्ये जाडजूड, पारंपरिक ऑक्सिडाइज्ड बांगड्या परिधान केल्या आहेत, ज्यामुळे तिचा पारंपरिक साज अधिक आकर्षक दिसत आहे.
-
पारंपरिक वेशभूषेला साजेल अशी साधी; पण आकर्षक केशभूषा जेनेलियाने केली आहे. तिने केस मागच्या बाजूला बांधून त्याची पोनीटेल केली आहे.
-
मेकअपमध्ये तिने नैसर्गिक आणि सटल (मवाळ) रंगांचा वापर केला आहे, ज्यामुळे तिच्या वेशभूषेसह त्यावरील दागिनेही अधिक उठून दिसत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : जेनेलिया देशमुख/इन्स्टाग्राम)
Photos : जेनेलिया वहिनींचा रॉयल पारंपरिक लूक चाहत्यांच्या मनात ठरला चर्चेचा विषय
डिझायनर विक्रम फडणीस यांच्या क्रीम आणि मरून रंगाच्या लेहंग्यात झळकली जेनेलिया; ऑक्सिडाइज्ड दागिन्यांनी खुलवला तिचा मोहक अंदाज
Web Title: Bollywood actress genelia deshmukh traditional dress photoshoot viral svk 05