-
या वादाची सुरुवात झाली ती एका जुना व्हिडीओमुळे, ज्यात गीतकार जावेद अख्तर यांनी धर्म, हिंदू-मुस्लिम संबंध आणि आधुनिक भारतातील धार्मिक कट्टरतेबाबत आपले विचार मांडले होते.
-
हा व्हिडीओ मूलतः IFP (India Film Project)साठी घेतलेल्या मुलाखतीतला असून, सध्या सोशल मीडियावर अचानक व्हायरल झाला.
-
जावेद अख्तर यांनी हिंदू धर्मातील लवचिकतेवर भाष्य केले आणि मुस्लिम कट्टरपणाशी तुलना करीत म्हटले, “हिंदूंनी मुस्लिमांसारखे होऊ नये.”
-
त्यांनी १९७५ मधील शोले चित्रपटातील प्रसिद्ध सीन सांगितला, ज्यात धर्मेंद्र शंकराच्या मूर्तीच्या मागे लपतो, “आज असे सीन शक्य आहेत का”, असा प्रश्न उपस्थित केला.
-
हा व्हिडीओ पाहून गायक लकी अली यांनी जावेद अख्तर यांच्यावर थेट टीका केली, “जावेद अख्तरसारखे बनू नका, तो कधीच ओरिजिनल नव्हता आणि दिसायलाही अग्ली अॅज F**k…”असे संबोधले.
-
लकी अलीची टीका सोशल मीडियावर पसरताच वादाने मोठा आकार घेतला आणि अनेकांनी या विधानांवर आपली मते व्यक्त केली.
-
लकी अलीने आता पुन्हा एक खोचक पोस्ट करत जावेद अख्तर यांच्याबाबत जे बोललो त्यासाठी दिलगिरी व्यक्त केली, ते म्हणाले की “उद्धटपणा हा कुरुप असतो. मी माझ्याकडून जे बोललो ते चुकीचं होतं. राक्षसांनाही भावना असतात त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो जर मी कुणाचं राक्षसी मन आणि भावना दुखावल्या असतील.” या आशयाची पोस्ट लकी अलीने केली आहे. त्याच्या या पोस्टचीही चर्चा सुरु झाली आहे.
-
त्यांच्या विधानानंतर वाद पुन्हा उजेडात आला. कारण- जुना व्हिडीओ आता नव्या संदर्भात लोकांपुढे आला आणि काहींना अख्तरांचे मत कठोर वाटले.
-
या वादातून धर्म, कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर पुन्हा चर्चेला गती मिळाली आहे.
-
सोशल मीडियावर या चर्चेने गदारोळ उडवला असून चाहत्यांमध्ये दोन्ही कलाकारांविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिसत आहेत.
जावेद अख्तर यांचा ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल; लकी अलींची थेट टीका : वादाची नेमकी सुरुवात कशाने?
Javed Akhtar and Lucky Ali Controversy : जुन्या व्हिडीओवरून जावेद अख्तर यांच्यावर लकी अली यांची खोचक टीका
Web Title: Javed akhtar lucky ali controversy viral old interview religion hindu muslim svk 05