-

छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही दर आठवड्यात येणाऱ्या टीआरपीच्या आकडेवारीवरून ठरवली जाते. गेल्या तीन वर्षांपासून सायली-अर्जुनची ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीमध्ये अधिराज्य गाजवत आहे. ( फोटो – स्टार प्रवाह )
-
११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत कोणत्या मराठी मालिकांना सर्वाधिक टीआरपी मिळालाय याची आकडेवारी नुकतीच समोर आलेली आहे. या यादीत पहिल्या पाच मालिका ‘स्टार प्रवाह’च्या आहेत. अशी माहिती टीआरपी पेजेसवरून शेअर करण्यात आली आहे. ( फोटो – स्टार प्रवाह )
-
स्टार प्रवाहच्या मालिकांचा TRP
१.ठरलं तर मग – ५.३
२.घरोघरी मातीच्या चुली – ४.७
३.कोण होतीस तू, काय झालीस तू – ४.५
४.नशीबवान – ४.४
५.लक्ष्मीच्या पाऊलांनी, तू ही रे माझा मितवा – ४.२ ( फोटो – स्टार प्रवाह ) -
याशिवाय ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘येड लागलं प्रेमाचं या मालिकांना अनुक्रमे ४.१ आणि ३.८ इतका टीआरपी मिळाला आहे. ( फोटो – स्टार प्रवाह )
-
‘झी मराठी’च्या मालिकांबद्दल सांगायचं झालं तर, या वाहिनीवर कमळीने अव्वलस्थान मिळवलं आहे. ( फोटो – झी मराठी )
-
झी मराठीच्या मालिकांचा TRP
१.कमळी – ३.७
२.लक्ष्मी निवास – ३.४
३.वीण दोघांतली ही तुटेना – ३.३
४.तारिणी – ३.०
५.देवमाणूस – २.८ ( फोटो – झी मराठी ) -
तेजश्रीच्या वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेच्या टीआरपीत तुलनेने आधीपेक्षा वाढ झाल्याचं दिसत आहे. ( फोटो – झी मराठी )
-
आता ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत स्वानंदी-समरची लगीनघाई सुरू होणार आहे. त्यामुळे या विवाह विशेष भागांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ( फोटो – झी मराठी )
-
याशिवाय स्टार प्रवाह वाहिनीवर नव्याने सुरू झालेल्या ‘काजळमाया’ मालिकेचा ओपनिंग टीआरपी काय असेल हे जाणून घेण्यासाठीही प्रेक्षक उत्सुक आहेत. ( फोटो – स्टार प्रवाह )
स्टार प्रवाहवर ‘सायली’ अन् झी मराठीवर ‘कमळी’ नंबर वन! TRP मध्ये कुणी मारली बाजी? टॉप ५ मालिका कोणत्या, पाहा यादी…
TRP च्या यादीत तेजश्री प्रधानची मालिका कोणत्या स्थानी? पाहा टॉप-५ मालिकांची यादी…
Web Title: Star pravah and zee marathi serial trp updates know the top 5 shows sva 00