-

अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) हिने निसर्गातील शांत क्षणांचा अनुभव इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे शेअर केला आहे.
-
या पोस्टमध्ये प्रिया बापट एका डोंगराच्या माथ्यावर बसलेली दिसत आहे. तिच्यामागे हिरवीगार दरी आणि क्षितिजाचे विहंगम दृश्य आहे. तिने पांढरा साधा टॉप आणि गडद रंगाची पँट परिधान केली आहे.
-
प्रिया बापटने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “हे सुख आहे. जसजशी मी मोठी होत आहे, तसतशी मला निसर्गात अधिक शांतता मिळते. मी नेहमीच एक ‘पर्वतीय मुलगी’ (mountain girl) राहिली आहे. लहान ट्रेक्स, स्वच्छ हवा, फक्त सूर्याचा उबदारपणा, या विशाल, सुंदर ब्रह्मांडात मी केवळ एक छोटा थेंब आहे याची जाणीव होते आणि प्रत्येक वेळी तीच जाणीव नवीन वाटते. इथेच मला माझा विसावा (solace) मिळतो आणि अर्थातच, माझ्या प्रिय मैत्रिणीच्या सर्वोत्तम सोबतीने शुद्ध सुखाचा (pure sukoon) दिवस घालवला; यामुळेही मी खरी आनंदी आहे.”
-
अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, जसजसे वय वाढत आहे तसतसे तिला निसर्गाच्या सान्निध्यात अधिक समाधान आणि शांतता अनुभवता येत आहे.
-
लहानपणापासूनच तिला डोंगरावर भटकंतीची (small hikes) आणि निसर्गाची ओढ असल्याचे तिने स्वतःला ‘पर्वतीय मुलगी’ म्हणत नमूद केले आहे.
-
स्वच्छ हवा (clean air) घेणे आणि सूर्याचा उबदारपणा (soaking in the sun’s warmth) हा तिच्यासाठी आनंदाचा आणि समाधानाचा क्षण होता.
-
ती लिहिते की, या विशाल आणि सुंदर जगात (vast, beautiful universe) आपण केवळ एक छोटासा भाग (tiny drop) आहोत.
-
प्रिया बापटसाठी ही जाणीव आणि निसर्गाचे वातावरण हाच तिचा खरा विसावा (solace) आहे, जिथे तिला खरी आत्मिक शांती मिळते.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट/इन्स्टाग्राम)
Photos: प्रिया बापटला डोंगरावर गवसले ‘सुख’ म्हणाली; ‘जसजसे मी मोठी होत आहे…’
स्वच्छ हवा, सूर्याची उब आणि मैत्रिणीची सोबत… डोंगरावर प्रिया बापटला मिळाली शांतता.
Web Title: Marathi actress priya bapat mountain top peace nature sukoon moment photos viral svk 05