• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganesh chaturthi 2024 chants of ganpati bappa moreya echo as festivities begin see photos spl

Ganesh Chaturthi 2024 : देशभरात गणेश चतुर्थी थाटामाटात साजरी, सर्वत्र ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, पाहा छायाचित्रे

Ganesh Chaturthi celebrations 2024: देशभरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सर्वत्र ऐकू येत आहे. मंडळांमध्ये असो किवा घरी असो गणेशाच्या भव्य मूर्तींची प्रतिष्ठापना केली जात आहे.

September 7, 2024 19:28 IST
Follow Us
  • Ganesh Chaturthi celebrations 2024
    1/15

    गणेश चतुर्थीचा पवित्र सण देशभरात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात गणेश चतुर्थीला भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. (पीटीआय फोटो)

  • 2/15

    सकाळपासूनच ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष घरोघर, मंदिरे, मंडपांमध्ये ऐकू येत असून संपूर्ण वातावरण भक्ती आणि श्रद्धेने निनादून निघाले आहे. (पीटीआय फोटो)

  • 3/15

    मंदिरांमध्ये गणपतीच्या विशेष आरतीचे आयोजन करण्यात येत असून बाजारपेठांपासून मंदिरापर्यंत सर्वत्र भाविकांची गर्दी दिसून येत आहे. (पीटीआय फोटो)

  • 4/15

    घरोघरी आणि मंडपांमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या थाटामाटात केली जात आहे. चला पाहूया देशभरातील गणपती बाप्पाची ही सुंदर छायाचित्रे. (पीटीआय फोटो)

  • 5/15

    या फोटोमध्ये सातारा जिल्ह्यातील कराड येथे गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी भाविक गणेशाची मूर्ती मंडपाकडे घेऊन जाताना दिसत आहेत. (पीटीआय फोटो)

  • 6/15

    कराडमध्ये गणेश चतुर्थी उत्सवाच्या पूर्वसंध्येला गणेशमूर्ती मंडपाकडे नेण्यापूर्वी भाविक काळजी घेताना दिसत आहेत. (पीटीआय फोटो)

  • 7/15

    या चित्रात, मुंबईतील गणेश चतुर्थीला मूर्तीची स्थापना करण्यासाठी मूर्तिकार झाकलेली गणेशाची मूर्ती उघडी करताना दिसत आहेत. (पीटीआय फोटो)

  • 8/15

    हा फोटो मुंबईतील दादरमध्ये गणेश चतुर्थी उत्सवाच्या पूर्वसंध्येला काढलेला आहे, यामध्ये खरेदीदारांची गर्दी दिसत आहे. (पीटीआय फोटो)

  • 9/15

    पुण्यात गणेश चतुर्थीनिमित्ताने एक कुटुंब गणपतीची मूर्ती घेऊन जाताना दिसत आहे. गणपती बाप्पाला घरी घेऊन जाताना कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसतो आहे. (पीटीआय फोटो)

  • 10/15

    हे चित्र नागपुरातील असून त्यात गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीत भक्त गणेशमूर्ती मंडपाकडे नेताना दिसत आहेत. (पीटीआय फोटो)

  • 11/15

    हे चित्र जयपूरचे आहे, ज्यात गणेश चतुर्थीला मोती डुंगरी गणेश मंदिरात भक्त पूजा करताना दिसत आहेत. (पीटीआय फोटो)

  • 12/15

    या फोटोमध्ये, एक महिला कलाकार नवी दिल्लीतील गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान विक्रीसाठी आणलेल्या गणपतीच्या मातीच्या मूर्तीला अंतिम स्पर्श देताना दिसत आहे. (पीटीआय फोटो)

  • 13/15

    या चित्रात गुवाहाटीमध्ये गणेश चतुर्थी उत्सवानिमित्त भाविक प्रार्थना करताना दिसत आहेत. (पीटीआय फोटो)

  • 14/15

    मुंबईच्या लालबागमध्ये गणेश गल्लीच्या राजाचे म्हणजेच गणेशाच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. (पीटीआय फोटो)

  • 15/15

    हे चित्र मुंबईतील गणेश चतुर्थी उत्सवातील सिद्धिविनायक मंदिराचे आहे, ज्यामध्ये भक्त मोठ्या संखेने ‘आरती’मध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. (पीटीआय फोटो)

TOPICS
गणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मराठी बातम्याMarathi News

Web Title: Ganesh chaturthi 2024 chants of ganpati bappa moreya echo as festivities begin see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.