-   अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि पत्नी सुखदा खांडकेकर यांच्या घरी यंदा गणेशोत्सवात बाप्पाचे आगमन झाले आहे. 
-  गुलाबी रंगाच्या कुर्त्यात अभिजीतने पारंपरिक लूक पूर्ण केला असून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बाप्पाच्या स्वागताचा उत्साह व्यक्त करतो. 
-  सुखदाने परिधान केलेली जांभळ्या व रुपेरी छटांची पैठणी विशेष आकर्षण ठरली आहे. 
-  साडीवरील फुलांची नक्षी आणि सोनेरी दागिन्यांमुळे तिचा पारंपरिक लूक अधिक खुलून आला आहे. 
-  घरात साध्या पण आकर्षक सजावटीने बाप्पाचे स्वागत करण्यात आले असून वातावरण प्रसन्न झाले आहे. 
-  गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोघांनी एकत्र बाप्पाची मूर्ती हातात घेतलेले छायाचित्र सोशल मीडियावर झळकले. 
-  सुखदाच्या पैठणीतील पारंपरिक सौंदर्य आणि अभिजीतचा देखणा लूक यामुळे दांपत्याचे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. 
-  दांपत्याचा पारंपरिक लूक, बाप्पाची सुबक मूर्ती आणि सजावट या तिन्हींच्या संगमामुळे उत्सवाची शोभा अधिक वाढली आहे. 
-  (सर्व फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर/इन्स्टाग्राम) 
Photos: जांभळी पैठणी, गुलाबी कुर्ता; अभिजित व सुखदा खांडकेकर यांचे पारंपरिक लूकमधील फोटोशूट चर्चेत
पारंपरिक पोशाखातील खांडकेकर दाम्पत्याचा उत्साह; सुखदाच्या पैठणी साडीतील राजस लूक आणि घरातील सजावटीतून खुलला बाप्पाच्यि स्वागताचा सोहळा
Web Title: Marathi actor abhijit khandkekar and sukhada khandkekar traditional look photoshoot viral svk 05