• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganesh festival 2025 why gsbs ganpati immersed after 5 days spl

देशातल्या सर्वात श्रीमंत ‘जीएसबी गणपती’चं पाच दिवसांनंतर का केलं जातं विसर्जन?

यावर्षी मंडळाने ४७४ कोटी रुपयांपेक्षा जास्तचा विमा काढल्यानेही हे मंडळ चर्चेत आहे

Updated: September 1, 2025 13:32 IST
Follow Us
  • GSB Ganpati Visarjan mumbai
    1/9

    मुंबईतील सर्वात श्रीमंत जीएसबी गणपतीचं आज विसर्जन पार पडत आहे. GSBS सेवा मंडळ सर्वात श्रीमंत आणि भव्य गणपती मंडळांपैकी एक आहे. (Photo: Instagram)

  • 2/9

    या गणपती मंडळाकडे ६९ किलो सोनं आणि ३४० किलोपेक्षा जास्त चांदी आहे. (Photo: Instagram)

  • 3/9

    यावर्षी मंडळाने ४७४ कोटी रुपयांपेक्षा जास्तचा विमा काढल्यानेही हे मंडळ चर्चेत आहे. (Photo: Ajinkya Tatke/Instagram)

  • 4/9

    इतर मंडळांच्या तुलनेत या बाप्पाचे विसर्जन लवकर होते. जीएसबी गणेश मंडळाचं यंदाचं ७२ वं वर्ष आहे. दरम्यान, एवढ्या वर्षांमध्ये ५ दिवसचं हा गणपती बसवला जाण्याची परंपरा आहे. (Photo: Instagram)

  • 5/9

    जीएसबी गणपती म्हणजे ‘गौड सारस्वत ब्राह्मण’ गणपती. गौड सारस्वत ब्राह्मण समुदायाने १९५४ मध्ये स्थापन केलेलं हे मंडळ भारतातील सर्वात श्रीमंत गणपती मंडळ म्हणून प्रसिद्ध आहे. (Photo: Instagram)

  • 6/9

    विधींनुसार व परंपरेनुसार गणपती बाप्पाची पाच दिवस सेवा केली जाते आणि सन्मानपूर्वक विसर्जन केले जाते. (Photo: Instagram)

  • 7/9

    जीएसबीच्या बाप्पाची मूर्ती शुद्ध सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान रत्नांनी सजवलेली असते, ज्यामुळे एक दिव्य आणि भव्य आभा निर्माण होते जी दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करत राहते. (Photo: Ajinkya Tatke/Instagram)

  • 8/9

    पाचव्या दिवशी विसर्जन करण्यामागचे कारण काय?
    अवधूत शेंबेकर गुरुजींनी लोकसत्ताला सांगितलेलं कारण…
    “गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर त्याची पूजा करून विसर्जन करण्याचे हे व्रत एक किंवा दीड दिवसाचे आहे. पण, उत्सवात आणखी रंगत आणण्यासाठी किंवा कित्येक जण नवस पूर्ण करण्यासाठी पाच दिवस, सात दिवसांनी गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. त्यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नाही. गणेशभक्त आपल्या हौसेनुसार गणेशमूर्तीचे विसर्जन पाचव्या किंवा सातव्या किंवा दहाव्या दिवशी करतात. (Photo: Ajinkya Tatke/Instagram)

  • 9/9

    नक्षत्रानुसार विसर्जन काय असते?
    गौरी व गणपतीचे आगमन आणि विसर्जन हे नक्षत्रानुसार होते. ज्या नक्षत्रामध्ये त्यांचे आगमन होते, त्याच्या पुढच्या नक्षत्राला त्यांचे विसर्जन होते. अनुराधा नक्षत्राला गौरीचे आगमन होते आणि मूळ नक्षत्राला तिचे विसर्जन होते. नक्षत्र कधी कधी पुढे-मागे होतात; त्यानुसार कधी हे विसर्जन पाचव्या दिवशी होते; तर कधी सातव्या दिवशी होते.” – अवधूत शेंबेकर गुरुजी (Photo: Ajinkya Tatke/Instagram) हेही पाहा- Photos: ‘पारु’ फेम अभिनेत्रीचा नऊवारी साडीमध्ये मराठमोळा लूक, फोटो व्हायरल

TOPICS
गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मराठी बातम्याMarathi News

Web Title: Ganesh festival 2025 why gsbs ganpati immersed after 5 days spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.