• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. soaked almonds health benefits of photos asy

भिजवलेले बदाम खाल्ल्याने होणारे फायदे जाणून घ्या

January 14, 2020 16:27 IST
Follow Us
  • बदामाच्या सालींमध्ये असणार्‍या काही घटकांमुळे त्याचे पचन होणे कठीण होते. म्हणूनच बदाम रात्रभर भिजत ठेवा. यामुळे बाहेरील आवरण मऊ होते व शरीराला बदामांतून अधिकाधिक पोषण मिळण्यास मदत होते. पाहूयात काय आहेत भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे…
    1/9

    बदामाच्या सालींमध्ये असणार्‍या काही घटकांमुळे त्याचे पचन होणे कठीण होते. म्हणूनच बदाम रात्रभर भिजत ठेवा. यामुळे बाहेरील आवरण मऊ होते व शरीराला बदामांतून अधिकाधिक पोषण मिळण्यास मदत होते. पाहूयात काय आहेत भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे…

  • 2/9

    भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. भिजवलेल्या बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्जाईम्समुळे शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते.

  • 3/9

    महिलांनी प्रेग्नंसीच्या काळात स्वत:कडे आणि बाळाच्या वाढीकडे पूर्ण लक्ष देण्याची विशेष गरज असते. त्यामुळे तिच्या आहार पौष्टिक आणि सकस पदार्थांचा समावेश असणं आवश्यक आहे. गरोदर असताना स्त्रियांनी नियमित भिजवलेले बदाम खावेत. गरोदर स्त्रियांनी नियमित भिजवलेले बदाम खाणे तिच्या आणि गर्भाच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असते. बदामातील फॉलिक अ‍ॅसिड गर्भाच्या मेंदूची आणि चेतासंस्थेची वाढ होण्यात मदत होते.

  • 4/9

    धकाधकीच्या जीवनात अनेकांना रक्तदाबाची समस्या निर्माण होते. अशा व्यक्तींनी दररोज भिजवलेले बदाम खावेत. भिजवलेल्या बदामामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. ‘जर्नल ऑफ फ्री रॅडीकल रिसर्च’नुसार बदामातील ‘अल्फा टेकोफेरॉल्स’ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास नैसर्गिकरित्या रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते

  • 5/9

    जर्नल ऑफ न्युट्रीशनच्या अहवालानुसार, बदामातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृदयावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृद्यविकारांपासूनही बचाव होतो. त्यामुळे आहारात बदामांचा समावेश अवश्य करावा.

  • 6/9

    बदलती जीवनशैली आणि फास्टफूड खाण्याची सवय यामुळे अनेक जण वाढत्या वजनाने त्रस्त असतात. अशा व्यक्तींनी भजवलेले बदाम खावेत. बदामात कॅलरी कमी असल्याने त्याचा आहारात समावेश करावा. बदामामुळे पचन सुधारते, वारंवार लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळते तसेच लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळते.

  • 7/9

    बदाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती वाढते.

  • 8/9

    बदामात उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असणारे अनेक घटक असतात. तसंच त्यामध्ये व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा ३, फॅटी अ‍ॅसिड देखील असतात. त्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

  • 9/9

    सर्व फायदे थोडक्यात.

Web Title: Soaked almonds health benefits of photos asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.