• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. new tata safari to be launched soon production begins in pune pant check expected price specifications and other details sas

लाडकी Tata Safari परतली! कंपनीने दाखवली पहिली झलक; पुण्यात प्रोडक्शनला झाली सुरूवात

Tata च्या विश्वासार्ह ‘सफारी’ ब्रँडचं पुनरागमन, नवीन आयकॉनिक Tata Safari आली…

Updated: September 9, 2021 00:37 IST
Follow Us
  • टाटा मोटर्सची लोकप्रिय एसयूव्ही Tata Safari नव्या अवतारात पुन्हा एकदा भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घाण्यासाठी सज्ज झालीये. सफारी हा टाटाचा एक मजबूत आणि प्रतिष्ठित ब्रँड असून देशातील ग्राहकांनी दोन दशकांहून अधिक काळ या एसयूव्हीला पसंती दिली आहे.
    1/10

    टाटा मोटर्सची लोकप्रिय एसयूव्ही Tata Safari नव्या अवतारात पुन्हा एकदा भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घाण्यासाठी सज्ज झालीये. सफारी हा टाटाचा एक मजबूत आणि प्रतिष्ठित ब्रँड असून देशातील ग्राहकांनी दोन दशकांहून अधिक काळ या एसयूव्हीला पसंती दिली आहे.

  • 2/10

    टाटा मोटर्सने गुरूवारी आपल्या नवीन Tata Safari ची पहिली झलक दाखवली. ही कंपनीची फ्लॅगशीप एसयूव्ही आहे. जानेवारी महिन्यातच ( 26 जानेवारी) कंपनी ही लाडकी एसयूव्ही लाँच करणार असून लवकरच नवीन सफारीच्या बूकिंगलाही सुरूवात होणार आहे.

  • 3/10

    पुण्यातील प्लांटमध्ये कंपनीने नवीन सफारीच्या प्रोडक्शनलाही सुरूवात केली असून लवकरच ही एसयूव्ही शोरुमपर्यंत पोहोचवली जाईल. ही 7-सीटर एसयूव्ही असणार आहे.

  • 4/10

    टाटाची ही आयकॉनिक एसयूव्ही आहे. याआधी ही कार Tata Gravitas नावाने ओळखली जात होती. ही कार कंपनीने पहिल्यांदा ऑटो एक्स्पो 2020 मध्ये आणली होती.

  • 5/10

    या एसयूव्हीचा नवीन अवतार अधिक दमदार आहे. नवीन सफारीची रचना, कार्यक्षमता, मल्टी टास्किंग, सेवा आणि दीर्घकाळ टिकणारी डेव्हलपमेंट क्वालिटी ही वैशिष्ट्ये या एसयूव्हीला पूर्वीपेक्षा अधिक दमदार बनवतात.

  • 6/10

    नवीन Tata Safari मध्ये कंपनीने “OMEGARC” (Optimal Modular Efficient Global Advanced Architecture)प्लॅटफॉर्मचा वापर केलाय. जो लँड रोव्हर च्या D8 प्लॅटफॉर्मपासून घेण्यात आला आहे.

  • 7/10

    टाटाच्या नवीन सफारीची इंटिरिअर थीम Oyster White रंगात असून कंपनी यासोबत Ash Wood डॅशबोर्डही देत आहे. तसेच कंपनीने व्हील आणि फ्रंटसाईडवर क्रोम फिनिश लूक दिला आहे.

  • 8/10

    नवीन सफारीत नवीन एक्सटिरियर पेंट पर्याय, नवीन अलॉय व्हील्स, आतल्या बाजूला सिग्नेचर-स्टाईल डुअल-टोन डॅशबोर्ड, तीन-स्पोक स्टिअरिंग व्हील्स, अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कार-प्लेसह 8.8 इंचांची फ्लोटिंग इन्फोटेन्मेंट सिस्टिम, व्हॉईस रेकग्नायजेशन, 7-इंचाचा इंस्ट्रूमेंट पॅनल असेल. याशिवाय गाडीमध्ये तपकिरी रंगाची लेदर सीट आणि जेबीएल स्पीकर्सही असतील.

  • 9/10

    नवीन टाटा सफारीत 2.0 लिटर, 4-सिलिंडर डिझेल इंजिन असण्याची शक्यता आहे. हे इंजिन 170 BHP पॉवर आणि 350 Nm टॉर्क निर्माण करतं. यासोबत 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्स असेल. याशिवाय सफारीमध्ये नवीन टर्बो पेट्रोल इंजिन आणि त्यासोबत DCT गिअरबॉक्स असण्याची शक्यताही आहे.

  • 10/10

    भारताच्या ऑटो मार्केटमध्ये टाटा सफारीची टक्कर नवीन जनरेशन Mahindra XUV500, 7 सीटर Hyundai Creta, MG Hector Plus, Toyota Innova Crysta यांसारख्या एसयूव्हींसोबत असेल. टाटा सफारीची किंमत किती असेल हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण टाटाच्या हॅरियरपेक्षा नवीन सफारीची किंमत थोडी जास्त असण्याची शक्यता आहे. हॅरियरच्या विविध व्हेरिअंटची एक्स-शोरुम किंमत 13.84 लाख ते 20.30 लाख रुपयांदरम्यान आहे.

TOPICS
टाटा मोटर्सTata Motors

Web Title: New tata safari to be launched soon production begins in pune pant check expected price specifications and other details sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.