-
देशातील प्रमुख कार कंपनी टाटा मोटर्सच्या (Tata Motors) 'टाटा मोटर्स इलेक्ट्रिक मोबिलिटी' अकाउंटवरुन करण्यात आलेलं एक ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत असून देशाच्या ऑटो सेगमेंटमध्येही या ट्विटमुळे विविध चर्चांना उधाण आलंय.
-
कंपनीने सध्या हे ट्विट डिलीट केलंय पण चर्चा काही थांबायचं नाव घेत नाहीयेत.
-
टाटा मोटर्सच्या त्या ट्विटमध्ये टेस्ला (Tesla) आणि टेस्लाचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांचा उल्लेख करत एका जुन्या बॉलिवूड सिनेमातील गाण्याच्या काही ओळी लिहिल्या होत्या. त्यामुळे टेस्ला आणि टाटा मोटर्स दोन्ही कंपन्या संयुक्तपणे एखाद्या प्रकल्पावर काम करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
-
टाटा मोटर्स इलेक्ट्रिक मोबिलिटीने आपल्या ट्विटमध्ये 1960 च्या दशकातील शम्मी कपूर आणि मुमताज यांच्या 'ब्रम्हचारी' सिनेमातील गाण्याच्या ओळी लिहिल्या होत्या. गाण्यात थोडा बदल करत ट्विटमध्ये, "आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर अखबार में, सब को मालूम है और सबको खबर हो गई"…असं लिहिलं होतं.
-
उल्लेखनीय म्हणजे या ट्विटमध्ये टाटा मोटर्सने नुकतंच भारतात पदार्पण करणाऱ्या टेस्लाच्या स्वागतासाठी #WelcomeTesla #TeslaIndia अशा हॅशटॅगचा वापर केला होता. याशिवाय टेस्लाचे मालक एलन मस्क यांनाही टॅग केलं होतं.
-
या ट्विटमुळे भारतीय बाजारात टाटा आणि टेस्ला यांची भागीदारी होत असल्याच्या चर्चांना उधाण आलं.
-
टेस्लाच्या भारतातील एंट्रीनंतर टाटा मोटर्सच्या शेअर्समध्येही तेजी बघायला मिळाली होती. टाटा मोटर्स आणि टेस्लामध्ये भागीदारी होत असल्याची चर्चा यामागील एक कारण असल्याचं सांगितलं जात होतं. त्यातच टाटाच्या ट्विटची भर पडली, त्यामुळे विविध अंदाज बांधायला सुरूवात झाली.
-
पण आता कंपनीने हे ट्विट डिलिट केलं असून टेस्लासोबतच्या चर्चांवर स्पष्टीकरणही दिलं आहे.
-
"टेस्लासोबत भागीदारीची अजून कोणती योजना बनवलेली नाही अशाप्रकारच्या बातम्या केवळ अफवा आहेत", असं स्पष्टीकरण कंपनीच्या प्रवक्त्याकडून देण्यात आलं आहे.
-
टाटा मोटर्सकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असलं तरी त्या डिलीट केलेल्या ट्विटमुळे अफवांच्या बाजारात मात्र तेजी अजूनही कायम आहे. ऑटोसेगमेंटमध्येही टाटा आणि टेस्लाच्या भागीदारीबाबत विविध तर्क-वितर्क लढवले जात आहे.
‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर अखबार में…’ TATA च्या ट्विटमुळे चर्चांना उधाण
TATA च्या ट्विटमागचा नेमका अर्थ काय??
Web Title: Tere mere pyaar ke charche tata motors teases tesla amid rumours of jv deletes tweet later sas