• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. tata safari 2021 booking amount revealed pre orders to open from 4 feb check expected price and other details sas

Safari नावासोबत Harrier Returns! बूकिंग अमाउंटबाबतही झाला खुलासा, उद्यापासून प्री-ऑर्डर

Safari नावासोबत Harrier Returns!

Updated: September 9, 2021 00:36 IST
Follow Us
  • टाटा मोटर्सची (Tata Motors) बहुप्रतिक्षित फ्लॅगशिप एसयूव्ही Tata Safari साठी अखेर उद्यापासून (दि.४) बूकिंगला सुरूवात होत आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत ही एसयूव्ही भारताच्या रस्त्यावर धावताना दिसू शकते.
    1/15

    टाटा मोटर्सची (Tata Motors) बहुप्रतिक्षित फ्लॅगशिप एसयूव्ही Tata Safari साठी अखेर उद्यापासून (दि.४) बूकिंगला सुरूवात होत आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत ही एसयूव्ही भारताच्या रस्त्यावर धावताना दिसू शकते.

  • 2/15

    टाटा मोटर्सच्या देशातील कोणत्याही अधिकृत डिलरशीपमध्ये या एसयूव्हीसाठी उद्यापासून (4 फेब्रुवारी ) ३० हजार रुपयांमध्ये बूकिंगला सुरूवात होणार आहे.

  • 3/15

    टाटा मोटर्सने प्रजासत्ताक दिनी नवीन सफारीवरुन पडदा हटवला होता. पुण्यातील प्लांटमध्ये या एसयूव्हीचं प्रोडक्शन सुरू आहे.

  • 4/15

    सफारी हा टाटाचा एक मजबूत आणि प्रतिष्ठित ब्रँड असून देशातील ग्राहकांनी दोन दशकांहून अधिक काळ या एसयूव्हीला पसंती दिली आहे.

  • नव्या अवतारातील हॅरियर : टाटाची ही लोकप्रिय एसयूव्ही नव्या अवतारात पुन्हा एकदा भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घाण्यासाठी सज्ज झालीये. नवीन सात आसनी टाटा सफारी एकप्रकारे 'टाटा हॅरियर'चं नवीन व्हर्जन असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे.
  • 5/15

    नवीन टाटा सफारी सहा विविध व्हेरिअंट्समध्ये लाँच केली जाणार आहे. यात XE, XM, XT, XT+, XZ, XZ+ या सहा व्हेरिअंट्सचा समावेश असेल.

  • 6/15

    टाटाची ही आयकॉनिक एसयूव्ही आहे. याआधी ही कार Tata Gravitas नावाने ओळखली जात होती. ही कार कंपनीने पहिल्यांदा ऑटो एक्स्पो 2020 मध्ये आणली होती.

  • 7/15

    इंजिन : नवीन टाटा सफारीत 2.0 लिटर, 4-सिलिंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन मिळेल. हे इंजिन 170 BHP पॉवर आणि 350 Nm टॉर्क निर्माण करतं. यासोबत 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्स असेल. याशिवाय इको, सिटी आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड असतील. तसेच, तीन ESP टेरेन रिस्पॉन्स मोड- (नॉर्मल, रफ आणि वेट Normal, Tough and Wet) देखील या एसयूव्हीमध्ये आहेत.

  • 8/15

    या एसयुव्हीचा नवीन अवतार अधिक दमदार आहे. नवीन सफारीची रचना, कार्यक्षमता, मल्टी टास्किंग, सेवा आणि दीर्घकाळ टिकणारी डेव्हलपमेंट क्वालिटी ही वैशिष्ट्ये या एसयूव्हीला पूर्वीपेक्षा अधिक दमदार बनवतात.

  • 9/15

    नवीन Tata Safari मध्ये कंपनीने “OMEGARC” (Optimal Modular Efficient Global Advanced Architecture)प्लॅटफॉर्मचा वापर केलाय. जो लँड रोव्हर च्या D8 प्लॅटफॉर्मपासून घेण्यात आला आहे.

  • 10/15

    टाटाच्या नवीन सफारीची इंटिरिअर थीम Oyster White रंगात असून कंपनी यासोबत Ash Wood डॅशबोर्डही देत आहे. तसेच कंपनीने व्हील आणि फ्रंटसाईडवर क्रोम फिनिश लूक दिला आहे.

  • 11/15

    नवीन सफारीत नवीन एक्सटिरियर पेंट पर्याय, नवीन अलॉय व्हील्स, आतल्या बाजूला सिग्नेचर-स्टाईल डुअल-टोन डॅशबोर्ड, तीन-स्पोक स्टिअरिंग व्हील्स, अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कार-प्लेसह 8.8 इंचांची फ्लोटिंग इन्फोटेन्मेंट सिस्टिम, व्हॉईस रेकग्नायजेशन, 7-इंचाचा इंस्ट्रूमेंट पॅनल असेल. याशिवाय गाडीमध्ये तपकिरी रंगाची लेदर सीट आणि जेबीएल स्पीकर्सही असतील.

  • 12/15

    पुण्यातील टाटाच्या प्लांटमध्ये या एसयूव्हीचं प्रोडक्शन सुरू असून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ही एसयूव्ही कंपनीच्या शोरुमपर्यंत पोहोचेल आणि ग्राहकांनाही महिन्याच्या अखेरपर्यंत ही एसयूव्ही घरी घेऊन जाता येऊ शकते.

  • 13/15

    बूकिंग अमाउंट किती? टाटा मोटर्सच्या देशातील कोणत्याही अधिकृत डिलरशीपमध्ये नवीन सफारीसाठी उद्यापासून (4 फेब्रुवारी ) ३० हजार रुपयांमध्ये बूकिंगला सुरूवात होणार आहे. त्यानंतर या महिन्यातच (महिना अखेरपर्यंत) ही एसयूव्ही भारताच्या रस्त्यावर धावताना दिसू शकते.

  • 14/15

    किंमत किती? : भारताच्या ऑटो मार्केटमध्ये टाटा सफारीची टक्कर नवीन जनरेशन Mahindra XUV500, 7 सीटर Hyundai Creta, MG Hector Plus, Toyota Innova Crysta यांसारख्या एसयूव्हींसोबत असेल. कंपनीने या एसयूव्हीची किंमत किती असेल याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही, पण 15 ते 24 लाख रुपयांदरम्यान या 7 सीटर एसयूव्हीची एक्स-शोरुम किंमत असण्याची दाट शक्यता आहे.

TOPICS
टाटा मोटर्सTata Motors

Web Title: Tata safari 2021 booking amount revealed pre orders to open from 4 feb check expected price and other details sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.