बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने तिच्या एका लुकने सर्वांना चकित केले आहे. पीव्ही सिंधूचे साडीतील फोटो व्हायरल होत आहेत. फोटोमधील तिचा साधेपणा लोकांची मने जिंकत आहे. (फोटो:vasundharadiamondrf/Instagram) -
प्रसिद्ध फोटोग्राफर अनिल कुमार यांनी पीव्ही सिंधूच्या या चित्रांचा एक कोलाज व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगावर गुलाबी, निळा आणि जांभळ्या रंगाची भरतकाम करत बनवलेली फुले आहेत. (फोटो: manish malhotra world/Instagram)
ही साडी प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केली आहे. पीव्ही सिंधूने या साडीमध्ये अतिशय सुंदर पोज दिल्या आहेत. तिच्या ह्या शैलीने हे सिद्ध केले आहे की ती केवळ तिच्या खेळावर राज्य करत नाही तर फॅशनमध्येही ती मागे नाही. (फोटो:vasundharadiamondrf/Instagram) -
लोक तिच्या स्टाईलला खूप पसंती देत आहेत. आणि म्हणूनच हे फोटो व्हायरल होत आहेत. (फोटो: afashionistasdiaries/Instagram)
-
पीव्ही सिंधूने परिधान केलेल्या साडीची किंमत १.९५ लाख रुपये आहे. (फोटो: manish malhotra world/Instagram)
पांढऱ्या नक्षीदार साडीतला पीव्ही सिंधूचा मोहक लूक, पहा फोटो
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने तिच्या एका लुकने सर्वांना चकित केले आहे. पीव्ही सिंधूची साडीतील फोटो व्हायरल होत आहेत.
Web Title: Pv sindhu looks elegant in embroidered white sari photos goes viral see photos ttg