-
मीठाशिवाय आपण पदार्थांची, जेवणाची कल्पना करूच शकत नाही.
-
पण पदार्थात बनवत असताना जरा जरी जास्त मीठ झालं तर चव बिघडते.
-
वेगेवगळ्या मसाल्यांपेक्षाही जेवणात मीठ फार महत्त्वाचे आहे.
-
सुदैवाने, पदार्थामधून जास्त मीठ काढून टाकण्याचे बरेच सोपे मार्ग आहेत.
-
रस्सा किंवा ग्रेव्हीच्या भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास तुम्ही ब्रेडचे तुकडेही घालू शकता. ब्रेड जास्तीचे मीठ शोषून घेईल.
-
कच्च्या बटाट्याचे काही काप करून खारट ग्रेव्ही, डाळ किंवा सूपमध्ये टाका. बटाट्याचे काप सुमारे २० मिनिटे राहू द्या आणि डिश सर्व्ह करण्यापूर्वी बटाट्याचे काप डिशमधून काढून टाका.
-
पिठाचे छोटे गोळे बनवा भाजीमध्ये किंवा अन्य शिजवत असलेल्या डिशमध्ये घाला. त्यांना १०-१५ मिनिटे ठेवा आणि सर्व्ह करण्यापूर्वी गोळे बाहेर काढा.
-
आपल्या करीमध्ये १-२ चमचे दही किंवा मलाई घाला जेणेकरून अतिरिक्त मीठाचा प्रभाव कमी होण्यास मदत होईल. यामुळे हे डिशच्या चवीमध्ये फारसा बदल होत नाही. तुम्हाला आवडेल अशीच चव येते.
-
तूपाचा वापर वरण किंवा अन्य रस्सा भाजीमध्ये केल्यास मीठ कमी करता येईल.
-
जर तुम्ही फक्त एक चिमूटभर अतिरिक्त मीठ घातले असेल तर ते संतुलित करण्यासाठी तुम्ही चिमूटभर साखर घालू शकता. पण जर जास्त मीठ झालं असेल तर अन्य पर्याय वापरा.
-
जर ग्रेव्हीमध्ये जास्त मीठ झालं तर पाणी घाला आणि उकळवा. डिशमधील अतिरिक्त मीठ संतुलित करण्यासाठी पाणी हा सर्वात सामान्य उपाय आहे.
-
लिंबाचा रस सहजपणे मीठ कमी करू शकतो. सोबतच पदार्थाला वेगळी चवही आणतो.
-
सुकी भाजीमध्ये मीठ जास्त झालं असेल तर चण्याची डाळ घाला. २-३ चमचे भाजून डाळ वापरा.
-
चण्याच्या डाळीप्रमाणे सुकी भाजीत मीठ जास्त झालं असेल तर २-३ चमचे बेसन त्यात घाला.
-
काजू पेस्ट हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे पदार्थातील मीठ कमी होईलच पण सोबतच अजून छान चवही येईल. (All Photo: Pixbay & Freepik)
जेवणात मीठ जास्त झालं आहे? मग ‘हे’ पर्याय वापरून बघाच
पदार्थात बनवत असताना जरा जरी जास्त मीठ झालं तर चव बिघडते. सुदैवाने, पदार्थामधून जास्त मीठ काढून टाकण्याचे सोपे मार्ग आहेत.
Web Title: Easy tips to remove extra salt from food ttg