• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. maruti suzuki launches allbnew celerio in india highest mileage car in the country cost just less than five lakhs ttg

देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार; किंमत पाच लाखांपेक्षाही कमी

मारुती सुझुकीने बुधवारी ही कार लाँच केली. नवी सेलेरिओ ही भारतातील सर्वात जास्त पेट्रोल इंधन कार्यक्षम कार असल्याचे कंपनीने म्हटले आहे

November 11, 2021 17:50 IST
Follow Us
  • देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने बुधवारी आपल्या हॅचबॅक कार सेलेरिओचा (CELERIO) नवीन अवतार ‘ऑल न्यू सेलेरियो २०२१’ लाँच केला. कंपनीने ही कार ४.९९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सादर केली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या कारचे सरासरी मायलेज २६.६८ किलोमीटर प्रति लिटर (kmpl) आहे.
    1/9

    देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने बुधवारी आपल्या हॅचबॅक कार सेलेरिओचा (CELERIO) नवीन अवतार ‘ऑल न्यू सेलेरियो २०२१’ लाँच केला. कंपनीने ही कार ४.९९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सादर केली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या कारचे सरासरी मायलेज २६.६८ किलोमीटर प्रति लिटर (kmpl) आहे.

  • 2/9

    जेन नेक्स्ट के १० सी इंजिनसह बनवलेली ही पहिली कार आहे. नवी सेलेरिओ ही भारतातील सर्वात जास्त पेट्रोल इंधन कार्यक्षम कार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ही कार पाचवी जनरल हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. डिलिव्हरीबद्दल कंपनीने म्हटले आहे की, नवीन सेलेरियो लवकरच ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.

  • 3/9

    नवीन सेलेरिओ २०२१ कारमध्ये सात इंच टचस्क्रीन कन्सोल, स्टार्ट आणि स्टॉपसाठी पुश बटण, ऑटो इंजिन स्टार्ट/स्टॉप, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील आहे. तुम्ही मारुती सुझुकी सेलेरियो २०२१ दोन नवीन फायर रेड आणि स्पीडी ब्लू कलर पर्यायांसह आर्क्टिक व्हाइट, सिल्की सिल्व्हर, ग्लिस्टेनिंग ग्रे आणि कॅफीन ब्राउनमध्ये खरेदी करायला मिळेल.

  • 4/9

    मारुती सुझुकीचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव सांगतात की, शहरी भागातील स्टायलिश कारप्रेमींना लक्षात घेऊन ही कार सादर करण्यात आली आहे. विशेषत: २४-३५ वयोगटातील ग्राहकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 

  • 5/9

    कारमध्ये ९९८ सी सी के १० सी ३ सिलेंडर इंजिन आहे. इंजिन ४९ के डब्ल्यू @ ५५०० आर पी एम ची कमाल पॉवर देते आणि ८९ एन एम @३५०० आर पी एम ची कमाल टॉर्क जनरेट करते. कारचे एकूण वजन १२६०किलो आहे.

  • 6/9

    सेलेरिओचे आतचे मॉडेल्स २०२१ लाँच झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बंद केले जातील. कंपनी त्याच्यानंतर पोर्टफोलिओमध्ये सीएनजी ट्रिम देखील समाविष्ट करेल.

  • 7/9

    पाच सीटची ही कार आहे. 

  • 8/9

    कारची सामान क्षमता ३१३ लीटर आहे. कारची इंधन टाकीची क्षमता ३२ लीटर आहे. कारमध्ये इलेक्ट्रिक पॉवर स्टिअरिंग आहे.

  • 9/9

    कारला समोर डिस्क ब्रेक सिस्टम आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक सिस्टम आहे. ( सर्व फोटो: http://www.marutisuzuki.com )

TOPICS
ऑटो न्यूजAuto NewsऑटोमोबाइलAutomobileकारCar

Web Title: Maruti suzuki launches allbnew celerio in india highest mileage car in the country cost just less than five lakhs ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.