• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. gudi padwa 2022 fashion look stylish and up to date by wearing these special saree style patterns prp

Gudi Padwa Fashion: यंदाच्या गुढीपाडव्याच्या दिवशी फॉलो करा साडीची हटके स्टाईल

अनेक घरांमध्ये तर महिला-मुलींनी पाडव्याच्या दिवशीची तयारी देखील सुरू केली असेल. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी काही खास साडी फॅशन स्टाईल दाखवणार आहोत. या साडी स्टाईल एकदा नक्की ट्राय करा.

Updated: March 31, 2022 13:08 IST
Follow Us
  • हल्ली सण आला की महिलांना नटण्यासाठी एक निमित्तच असतं. मराठी नवं वर्ष गुढीपाडवा आला की, अगदी लहान मुलींपासून ते मोठ्या महिलांपर्यंत नऊवारी साड्यांमध्ये सजूनधजून बाहेर पडलेल्या दिसतात. गुढीपाडव्याला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. अनेक घरांमध्ये तर महिला-मुलींनी पाडव्याच्या दिवशीची तयारी देखील सुरू केली असेल. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी काही खास साडी फॅशन स्टाईल दाखवणार आहोत. या साडी स्टाईल एकदा नक्की ट्राय करा.
    1/9

    हल्ली सण आला की महिलांना नटण्यासाठी एक निमित्तच असतं. मराठी नवं वर्ष गुढीपाडवा आला की, अगदी लहान मुलींपासून ते मोठ्या महिलांपर्यंत नऊवारी साड्यांमध्ये सजूनधजून बाहेर पडलेल्या दिसतात. गुढीपाडव्याला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. अनेक घरांमध्ये तर महिला-मुलींनी पाडव्याच्या दिवशीची तयारी देखील सुरू केली असेल. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी काही खास साडी फॅशन स्टाईल दाखवणार आहोत. या साडी स्टाईल एकदा नक्की ट्राय करा.

  • 2/9

    काठापदराची साडी- हल्ली बाजारात वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्या कितीही येऊ द्या, पण जेव्हा अंगावर काठापदराच्या साड्या नेसल्या जातात, तेव्हा आपोआप आपल्याला एक पारंपारिक लूक मिळतो. काठापदराच्या सिल्क साडीचा पर्याय सर्वात उत्तम आहे. (Photo: Instagram/ tejashripradhan)

  • 3/9

    खणाची साडी- अगदी तरूणाईपासून ते अभिनेत्रींपर्यंत खणाच्या साड्यांनी सर्वांनाच भुरळ पाडली आहे. खणाच्या साड्यांना मोठं वलय प्राप्त झालं आहे. यात गर्द निळा, लाल, हिरवा, मोरपिशी, कॉफी, ग्रे कलर जास्त चलतीत आहेत. नथ पदर खणाच्या साड्या, सरस्वती पदर खणाच्या साड्या, कस्टमाइज खणाची साडी, सौभाग्यवती खणाची साडी, खास काळ्या खणाच्या साड्या, टोप पदर खणाची साडी अशा अनेक डिझाईन्समध्ये या खणाच्या साड्या मिळतात. (Photo: Instagram/ urmila kothare )

  • 4/9

    इरकल साडी – इरकल साड्याही वैशिष्ट्यपूर्ण आणि परफेक्ट लूक देतात. इरकल हीदेखील अशी साडी आहे जी नेसायला सोपी आणि सावरायलाही सोपी आहे. मुळात या साडीमध्ये सर्वच गडद रंग असतात जे तुमचा लुक अतिशय सुंदर करतात. या साडीवर लहान लहान जरीचे बुट्टे असतात. शिवाय नेहमीच्या साड्यांच्या रंगांपेक्षा या साड्यांचे रंग थोडे वेगळे असल्यामुळे यंदाच्या गुढीपाडव्याला परफेक्ट लूक देतील. (Photo: Instagram/ prajakta_official )

  • 5/9

    नऊवारी साडी – आजकाल नऊवारी साडीचे विविध प्रकार (sadyanche prakar) बाजारात शिऊन आपल्याला मिळतात. तुम्हाला नऊवारी साडी कशी नेसायची हे माहीत नसलं तरी रेडीमेड नऊवारी नेसून तुम्ही या लुकला सुरूवात करू शकता. मात्र लक्षात ठेवा नऊवारी साडीचा रंग पारंपरिक आणि उठावदार असायला हवा. ज्यामुळे तुमचा लुकही सुंदर आणि साजरा दिसेल. शिवाय साडीचा काठ आणि कॉम्बिनेशन परफेक्ट असेल तर तुमचं फोटोशेन सर्वात हटके होईल. खण, पैठणी, इकरल, जिजामाता, राजमाता या प्रकारच्या नऊवारी साडी खूपच खुलून दिसतात. (Photo: Instagram/ akshaya deodhar)

  • 6/9

    उपाडा सिल्क- हल्ली उपाडा सिल्क साड्यांनाही बरीच पसंती दिली जातेय. गुढीपाडव्याच्या दिवशी घरातली कामे, पाहूण्यांचा पाहूणचार आणि सोबतच शोभयात्रेतल्या धावपळीत साडी सांभाळायला हलकी आणि दिसायला मात्र तितकीच आकर्षक आहे. यंदाच्या गुढीपाडव्यासाठी याचा पर्याय उत्तम ठरतो. तसंच यामध्ये विविध डिझाईन्सही बाजारामध्ये उपलब्ध आहेत. (Photo: etsy.com)

  • 7/9

    नारायण पेठ- हल्ली कोणताही पारंपारिक कार्यक्रम असला की महिला नारायण पेठ साड्यांना पहिली पसंती देत असतात. नेसायला सोपी आणि अतिशय हलकी पण दिसायला अगदी रॉयल अशी ही साडी असते. या साडीच्या रचनेवरून आणि काठावरून ओळखता येते. नारायण पेठ या साडीचा काठ सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. ही साडी पाचवार, सहावार आणि नऊवार या तिन्ही प्रकारात मिळते. (Photo: Twitter/ Spruha Joshi)

  • 8/9

    कांजीवरम अथवा कांचीपुरम – अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना तुम्ही कांजीवरम किंवा कांचीपुरम साड्यांमध्ये पाहिलं असेल. कांजीवरम पॅटर्नमध्ये दक्षिण भारतीय भरतकाम प्रचलित आहे. जे शुद्ध सोने आणि चांदी किंवा याच रंगाच्या मॅटलिक धाग्यांपासून करण्यात येते. सिल्कची गुणवत्ता आणि धाग्यांच्या निवडीवर साडीची किंमत अवलंबून असते. (Photo : iwmbuzz )

  • 9/9

    पैठणी – पैठणी साडी प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये तयार केली जाते. ही साडी प्रत्येक महिलेसाठी खास असते. प्रत्येक महिलेला आपल्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये ही साडी हवीच असते. या साडीवर सोनेरी किंवा चंदेरी धाग्यांनी एम्ब्रोयडरी वर्क केलं जाते. साडीच्या पदरावर अतिशय बारीक आणि आकर्षक एम्ब्रोयडरी करण्यात येते. (Photo: Instagram/ sonalee18588 )

TOPICS
गुढी पाडवा सेलिब्रेशनGudi Padwa Celebrationगुढीपाडवा २०२५Gudi Padwa 2025

Web Title: Gudi padwa 2022 fashion look stylish and up to date by wearing these special saree style patterns prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.