-
बालगंधर्व प्रांगणातील नंदा जलतरण तलाव येथे योग प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती.
-
योग प्रात्यक्षिकांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी योगा स्कूलतर्फे हे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
-
पाण्यात उभे राहून ही योग प्रात्यक्षिके करण्यात आली. यावेळी योगांचे प्रकार दाखवण्यात आले.
-
योगाचा उपयोग नेहमीच शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायद्यांसाठी केला जातो.
-
आजच्या वैद्यकीय संशोधनाने हे सिद्ध केले आहे की योग हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मानवजातीसाठी वरदान आहे.
-
योगासने शरीरातील सर्व अवयव आणि ग्रंथींचा व्यायाम करतात, त्यामुळे अवयव सुरळीतपणे काम करू लागतात.
-
योगासनांच्या नियमित सरावामुळे स्नायूंचा चांगला व्यायाम होतो.
-
योगामुळे तणाव दूर होतो, चांगली झोप लागते, भूक चांगली लागते, पचनक्रिया बरोबर राहते.
-
योगासने केल्याने सांधेदुखी, पाठदुखी इत्यादी वेदनांमध्ये चांगलीच सुधारणा होते आणि औषधाची गरज कमी होते.
Shani Gochar 2025: शनीच्या साडेसाती आणि ढैय्येपासून ५ राशींना मिळणार सुटका, करिअरमध्ये घेणार मोठी झेप, वर्षभर होईल पैशांचा पाऊस