Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. home remedies to get rid of dark circles under the eyes pvp

Photos : डोळ्याखालची काळी वर्तुळे घालवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपचार ठरतील फायदेशीर

सतत डोळे चोळणं, अ‍ॅलर्जी, झोप न येणं, डोळ्यांखालची निस्तेज त्वचा, वयोमान, डीहायड्रेशन, आनुवंशिकता आणि कधी कधी पिगमेण्टेशनमुळेही डोळ्यांखाली काळी वर्तृळं निर्माण होतात.

Updated: June 1, 2022 13:33 IST
Follow Us
  • तणाव, कमी झोप यांमुळे डोळ्याच्याखाली काळी वर्तुळे तयार होतात.
    1/25

    तणाव, कमी झोप यांमुळे डोळ्याच्याखाली काळी वर्तुळे तयार होतात.

  • 2/25

    सतत डोळे चोळणं, अ‍ॅलर्जी, झोप न येणं, डोळ्यांखालची निस्तेज त्वचा, वयोमान, डीहायड्रेशन, आनुवंशिकता आणि कधी कधी पिगमेण्टेशनमुळेही डोळ्यांखाली काळी वर्तृळं निर्माण होतात.

  • 3/25

    ते घालवण्यासाठी डॉक्टर आणि त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या क्रिमचा वापर केला जातो.

  • 4/25

    ही वर्तुळं घालविण्यासाठी मग बाजारात मिळणारी विविध उत्पादने वापरली जातात. त्यातील घटकांची योग्य ती माहिती नसल्याने ही उत्पादने अनेकदा त्वचेसाठी घातक ठरु शकतात.

  • 5/25

    केवळ सौंदर्यासाठी नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही या काळ्या वर्तुळांचा विचार व्हायला हवा. हे एखाद्या आजाराचे सूचक लक्षण असू शकते.

  • 6/25

    त्यामुळे ही वर्तुळे कशाने तयार झाली यांच्या मूळाशी जाऊन योग्य ते उपचार करायला हवेत.

  • 7/25

    अशाप्रकारच्या सर्व समस्यांसाठी चांगला आहार, पुरेसा व्यायाम, मानसिक शांती आणि योग्य तेवढा वेळ झोप गरजेची असते.

  • 8/25

    पण, काही घरगुती उपाय केले तर ही वर्तुळे काही प्रमाणात कमी करता येऊ शकतात.

  • 9/25

    टोमॅटो : एक लहान चमचा लिंबू रस आणि लहान टोमॅटोची पेस्ट एकत्र करुन ते मिश्रण डोळ्याखाली लावावे.

  • 10/25

    हे मिश्रण १० मिनीटे डोळ्यांवर ठेऊन त्यानंतर पाण्याने धुवावे. दिवसातून साधारण दोन वेळा हा प्रयोग केल्यास त्याचा फायदा होतो.

  • 11/25

    याबरोबरच टोमॅटो, लिंबाचा रस आणि पुदीना यांचा रस प्यायल्यासही काळी वर्तुळे कमी होण्यास फायदा होतो.

  • 12/25

    बटाटा : डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळे लवकरात लवकर घालवायची असतील तर बटाट्याचा अतिशय चांगला उपयोग होतो.

  • 13/25

    कच्च्या बटाट्याचा रस कापसाच्या बोळ्याने डोळ्यांवर लावावा. यातही कापूस या रसात भिजवून तो डोळ्यांवर ठेवावा.

  • 14/25

    १० मिनिटांसाठी हा कापूस असाच डोळ्यांवर ठेवा आणि नंतर डोळे धुवून टाका.

  • 15/25

    टी बॅग : थंड टी बॅग या डोळ्यांखालची काळी वर्तुळे जाण्यासाठीचा आणखी एक उत्तम पर्याय असतो.

  • 16/25

    या टी बॅग पाण्यात भिजवून त्या थोडा वेळ फ्रिजमध्ये गार करण्यासाठी ठेवाव्यात. त्यानंतर त्या डोळ्यांवर ठेवाव्यात.

  • 17/25

    या उपायाने तुम्हाला चेहऱ्यात बराच फरक झालेला दिसेल.

  • 18/25

    बदाम तेल : बदाम तेल केसांच्या, त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम काम करते. यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असते.

  • 19/25

    त्वचा कोमल होण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे झोपताना डोळ्याखाली बदाम तेल लावून मालिश केल्यास काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होते.

  • 20/25

    संत्र्याचा रस : संत्र्याचा रस हा डोळ्यांखाली काळी वर्तुळे दूर होण्यासाठी आणखी एक उत्तम घरगुती उपाय आहे.

  • 21/25

    रस डोळ्यांखाली लावल्यास अगदी कमी वेळात अतिशय चांगला उपयोग झालेला दिसतो.

  • 22/25

    केवळ काळी वर्तुळे कमी करण्यासाठीच नाही तर डोळ्यांची चमक वाढविण्यासाठीही याचा उपयोग होतो.

  • 23/25

    गुलाब पाणी : गुलाब पाण्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. त्वचेत जीवंतपणा येण्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो.

  • 24/25

    दिवसातून दोन वेळा १५ मिनीटांसाठी कापसावर गुलाबपाणी टाकून हा कापूस डोळ्यांवर ठेवल्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो.

  • 25/25

    येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. सर्व फोटो : Pixabay आणि Pexels

TOPICS
स्कीन केअरSkin Careस्कीन केअर टिप्सSkin Care Tips

Web Title: Home remedies to get rid of dark circles under the eyes pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.