Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. monsoon car care tips from engine to headlights to first aid box know helpful tips to get your car through the monsoon scsg

Photos: इंजिन, पार्किंग, वायपर्स, हेडलाइट्सपासून ते कागदपत्रांपर्यंत… पावसाळ्यात कारची काळजी घेण्यासाठी २५ टिप्स

Car Care Tips in Rainy Season: अगदी पार्कींगपासून ते इंजिन आणि हेडलाइटपर्यंत अनेक गोष्टींची पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घ्यावी लागते

Updated: July 14, 2022 17:34 IST
Follow Us
  • Monsoon Car Care Tips
    1/28

    पाऊस आला किंवा पाऊस येण्यापूर्वी आपण सर्व खबरदारी घेतो. छत्र्या, रेनकोट, पावसाळी चपला-बूट वगैरेची तजवीज केली जाते. बॅगेतील कागदपत्रे भिजणार नाहीत, मोबाइलमध्ये पाणी जाणार नाही याच्यासाठी हरतऱ्हेची काळजी घेतो. वाहनाचेही असेच असते.

  • 2/28

    तुमची कार असो वा बाइक, पावसाळ्यात तिची काळजी घेतलीच गेली पाहिजे. नाही तर ती कुरकुर करणारच.

  • 3/28

    अलीकडे वाहननिर्मात्या कंपन्याही पावसाळ्यात आपल्या कार/बाइकची काळजी कशी घ्यावी वगैरेची शिबिरे भरवत असतात. थोडक्यात काय कारने कुरकुर करू नये यासाठी आपण तिची काळजी घ्यावी हेच योग्य..

  • 4/28

    पावसाळ्यात वाहन चालविणे अधिकच धोकादायक बनते. तेवढेच ते वाहतूक कोंडीमुळेही नकोसे होते.

  • 5/28

    वाहन चालविताना सतत अनुभवास येणारा अस्पष्ट रस्ता यामुळे तर मोठे अपघात हे किरकोळ कारणासाठी घडलेले आपण पाहिले आहेत. बाहेरगावी जाताना दरडी कोसळून मार्ग बंद झाल्यावर वाहन तेथेच उभे करण्यावाचूनही पर्याय नसतो.

  • 6/28

    पावसाच्या वेळी वाहनांची वेगळ्या पद्धतीने काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. म्हणजे केवळ पावसाच्या धारांपासून बचाव करण्याचेच नव्हे तर अन्य कारणांमुळेही वाहनाची निगा ही घ्यावीच लागते.

  • 7/28

    अशा वेळी थेट टायरपासून गाडी आणि त्यातील इंजिन यांची स्थिती चांगली राहण्यासाठी धडपडावे लागते. पावसाळ्यात वाहनांचे टायर अधिक लवकर खराब होतात. इंजिनातील बिघाड तर सातत्याचाच.

  • 8/28

    कार आतून स्वच्छ ठेवा. एखादा छान कार प्युरिफायर गाडीमध्ये ठेवा. अनेकदा पावसाळ्यात गाडीच्या खिडक्या बंद करुनच प्रवास करता लागतो. त्यामुळे कारमध्ये कुझट, कुबट वास येणार नाही याची काळजी घ्या.

  • 9/28

    मान्सूनपूर्व गाडी सर्व तयारीनिशी सज्ज ठेवली तर ऐन पावसाळ्यात अचानक उद्भवणाऱ्या समस्यांपासून काही प्रमाणात बचाव करता येतोच. त्यासाठी या तयारीबरोबर तिची चाचणीही घेण्याची खबरदारी घ्यावी.

  • 10/28

    विशेषत: बॅटरीशी संबंधित इतर उपकरणे, सुविधा सुरळीत आहेत की नाही, हे आवर्जून पाहावे. हॉर्न, लाइट, इंडिकेटर, ऑटोमॅटिक डोअर लॉक अथवा ग्लास सिस्टम हे तपासून घ्यावे.

  • 11/28

    पावसाच्या थोड्या पाण्यातही या बाबींमध्ये बिघाड निर्माण होऊ शकतो. त्यासाठी पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध करून घ्यायला हवी.

  • 12/28

    अनेक कंपन्या त्यांच्या वाहनांसाठी मान्सूनमध्ये विशेष वाहन तपासणी शिबीर, कार्यशाळा राबवीत असतात. या वेळी आवश्यक उपकरणे बदलण्याबरोबरच त्यांची सततची देखभालही उपलब्ध करून दिली जाते.

  • 13/28

    गाडीची अंतर्गत काळजी पावसाळ्यात जेवढी घ्यावी तेवढीच ती बाहेरूनही घ्यावी लागते. विशेषत: वाहनाचा रंग न उडण्यासाठी काही आवश्यक प्रक्रिया करून घेणे गरजेचे आहे.

  • 14/28

    त्याचबरोबर गाडीवरील स्टेनलेस स्टीलच्या वस्तूंना गंजविरोधक मुलामा लावून घ्यावा. टायरमधील हवा, गॅसवरील वाहन असल्यास तेथील सुरक्षा यावरही लक्ष द्यायला हवे. गाडीचे टेल लॅम्पही व्यवस्थित प्रकाश बाहेर टाकतात ना हेही पाहायला हवे.

  • 15/28

    इंडिकेटर लॅम्पवरील प्लॅस्टिकची आवरणे नीट आहेत का ती तुटलेली अथवा अपारदर्शक नाहीत ना हेही तपासून पाहावे. वाहनांमधील ब्रेकची स्थिती उत्तम आहे, हे सतत प्रात्यक्षिकाने तपासून पाहावे.

  • 16/28

    तांत्रिक मदत घेणे आणि कार जवळच्या अधिकृत गॅरेजमध्ये नेणे योग्य आहे.

  • 17/28

    नवीन बांधलेल्या भिंतीजवळ किंवा मोठय़ा झाडाखाली वाहनाचे पार्किंग करू नका.

  • 18/28

    वादळ किंवा मुसळधार पाऊस यामुळे ते पडू शकतात.

  • 19/28

    बॅटरी, इलेक्ट्रिकल वायरिंग, हेडलाइटस्, टायर्स, इंजिन, वायपर्स व अंतर्गत गंजविरोधी कोटिंग नियमितपणे तपासण्याचे लक्षात ठेवा.

  • 20/28

    टायरमधील दाब, ट्रेड डेप्थ व स्पेअर व्हील हेसुद्धा तपासा. कापडी फ्लोअर मॅटस्ऐवजी प्लास्टिक/रबर मॅटस्चे आवरण घाला, ज्यामुळे ओलसरपणा व दरुगधीपासून संरक्षण होईल.

  • 21/28

    बँडेज, वेदनेपासून आराम देणारे स्प्रे, अँटिसेप्टिक क्रीम, एव्हील व अ‍ॅस्पिरीन यांसारखे अ‍ॅन्टी-अ‍ॅलर्जक्सि इत्यादींसह सुसज्ज असलेल्या प्रथमोपचार किटची सुविधा असावी, तसेच छत्री/रेनकोट हेदेखील जवळ बाळगावे. गंभीर स्वरूपात आजारी असलेल्या लोकांनी प्रवासादरम्यान त्यांची औषधे जवळ ठेवावीत.

  • 22/28

    पावसाळ्यात काचांवरील वायपर नेहमी चालू असेल असे पाहावे. रात्रीच्या वेळी लाइट जेवढा आवश्यक तेवढेच मान्सूनमध्ये वायपर. शक्यतो दोन्ही आणि आवर्जून चालकासमोरील वायपर चालू स्थितीत असायला हवे. अशा वायपरच्या अतिरिक्त जोड्या घेऊन ठेवल्या तरी बिघडत नाही.

  • 23/28

    कारण य़ा वायपरमधील नाजूक रबर लवकर खराब होते अथवा ते नेमक्या मांडणीत नसेल तर नादुरुस्त होते. वायपरसाठी पाणी व्यवस्थित काचेवर पडते आहे ना त्याचीही चाचपणी करावी.

  • 24/28

    मुसळधार पाऊस पडत असताना वाहन चालविणे टाळा. पण जर अत्यावश्यक असेल तर केवळ पहिल्या गियरवर गाडी चालवा आणि पूर्ण एक्सिलरेटरचा वापर टाळा.

  • 25/28

    पाणी भरलेल्या क्षेत्रातून वाहन चालविताना खिडक्याच्या काचा बंद ठेवा. कार मध्येच बंद पडली तर कार लगेच सुरू करण्याचा प्रयत्न करू नका.

  • 26/28

    गळतीमुळे वाहनातील अंतर्गत विशेषत: आसन व्यवस्था विनाकारण खराब होण्याची शक्यता अधिक असते. अंतर्गत रचनेतही अधिक आकर्षकता टाळून आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी व्हायला हवी. त्याचबरोबर सततच्या पाण्याच्या सान्निध्यामुळे लेग स्पेसमध्ये नेहमी स्वच्छता होईल अथवा पाण्याचा निचरा होईल, हे पाहावे.

  • 27/28

    कार बिघडली तर.. जर तुमची कार बिघडली, तर कार पार्क करा आणि जवळपासच्या गॅरेजचा शोध घ्या. तसेच गॅरेजच्या नावांची यादी सोबत ठेवा.

  • 28/28

    तुमच्या सेल फोनमध्ये आयसीई (तात्काळ स्थितीमध्ये) नंबर सेव्ह करा, ज्यामुळे काही घटनांमध्ये जवळच्या गॅरेजला फोन करता येईल. तसेच हॉस्पिटल्स, पोलीस स्टेशन्स, अग्निशमन दल यांचे नंबरदेखील सेव्ह करा. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत)

TOPICS
ऑटो न्यूजAuto NewsऑटोमोबाइलAutomobileमान्सून अपडेटMonsoon Updateमुंबईतील पाऊसMumbai Rain

Web Title: Monsoon car care tips from engine to headlights to first aid box know helpful tips to get your car through the monsoon scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.