-
Maruti Suzuki All-New Alto K10 : मारुती सुझुकीने गुरुवारी (१८ ऑगस्ट) दिल्लीत आपल्या ‘ऑल न्यू अल्टो के १०’ मॉडेलचं लाँचिंग केलं.
-
या कारची जोरदार चर्चा आहे. त्या निमित्ताने ‘अल्टो के १०’ मॉडेलची किंमत, फीचर अशा सर्व वैशिष्ट्यांचा आढावा.
-
‘ऑल न्यू अल्टो के १०’ मॉडेलमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातील १. कारच्या समोरच्या बाजूला मधमाशांच्या पोळ्याच्या पॅटर्नप्रमाणे ग्रील
-
२. समोरून हसऱ्या चेहऱ्याचं युनिक डिझाईन
-
३. कारला नवीन ट्रेंडी हेडलाईट डिझाईन, व्हेरिएंटप्रमाणे यात बदल
-
४. कारला मोठी आर १३ (R13) व्हिल्स
-
५. संपूर्ण कारमध्ये उत्तम गुणवत्तेचा आवाज पोहचवणारं ‘फ्लोटिंग ऑडिओ युनिट’
-
६. बसताना पायांना आरामदायी वाटावं यासाठी डिझाईनमध्ये विशेष सुधारणा
-
अल्टो के १० च्या इंजिनची वैशिष्ट्यांपैकी १. के सीरीजमधील १ लिटर क्षमतेचं ड्युअर जेट, ड्युअल व्हीव्हीटी इंजिन.
-
२. ४९ केव्ही (६६.६२ पीसी), ५५०० आरपीएम पीक पॉवर आणि ८९ एनएस, ३५०० आरपीएम टॉर्क
-
३. २४.९० किलोमीटर प्रति लिटर इंधन क्षमता
-
४. कार व्हरिएंटमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअर शिफ्ट उपलब्ध
-
स्मार्ट कनेक्टिव्हिटी फिचर मध्ये १. स्मार्ट फ्ले स्टुडिओ सिस्टम, स्मार्टफोन नेव्हिगेशन आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी (अॅपल कार प्ले, अँड्रॉईड ऑटो आणि इतर स्मार्टप्ले अॅप्स)
-
२. स्टेअरिंगवर ऑडिओ व व्हाईस कंट्रोल
-
३. पुढील आणि मागील दोन्ही दरवाजांवर स्पिकर्स
-
४. डिजीटल स्पिडोमीटर, फ्रंट पॉवर विंडोव स्विचेस
-
सुरक्षा विषयक फीचरमध्ये १. ड्युअल एअरबॅग
-
२. अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) ३. प्री टेंशनर व फोर्स लिमिटर फ्रंट सीट बेल्ट
-
४. रिव्हर्स पार्किंग सेंसॉर ५. स्पीड सेंसिंग ऑटो डोअर लॉक आणि हाय स्पीड अलर्ट
-
ऑल न्यू अल्टो के १० ची किंमत ३ लाख ९९ हजार रुपये इतकी आहे. मात्र, व्हेरिएंटनुसार या किमतीत बदलही होत आहे.
-
१. Std व्हेरिएंट – ३ लाख ९९ हजार रुपये २. Lxi व्हेरिएंट – ४ लाख ४२ हजार रुपये
-
३. Vxi व्हेरिएंट – ४ लाख ९९ हजार ५०० रुपये (ऑटो गेअर – ५ लाख ४९ हजार ५००) ४. Vxi+ व्हेरिएंट – ५ लाख ३३ हजार ५०० रुपये (ऑटो गेअर – ५ लाख ८३ हजार ५००) (सर्व फोटो सौजन्य – मारुती सुझुकी इंडिया)
Photos : प्रति लिटर २५ चं मायलेज देणारी Maruti Suzuki ची नवी Alto K10 कशी दिसते? किंमत, फीचर काय? पाहा…
मारुती सुझुकीच्या ‘ऑल न्यू अल्टो के १०’ मॉडेलची किंमत, फीचर अशा सर्व वैशिष्ट्यांचा आढावा.
Web Title: Photos of maruti suzuki all new alto k10 car price features average mileage all on one place pbs