-
अनेक वर्षांची मेहनत व कमाई एकत्र करून आपण घर विकत घेता पण जर विचारपूर्वक निर्णय घेतला नाही तर ही गुंतवणूक डोक्याला ताप ठरू शकते. म्हणूनच घर किंवा प्रॉपर्टी विकत घेताना खाली दिलेले प्रश्न आवर्जून विचारा. (फोटो: Financial Express)
-
घराची पूर्णपणे माहिती घ्या. वास्तू किती जुनी आहे? मूळ मालक कोण आहेत? प्रॉपर्टीवर कर्ज आहे का? हे प्रश्न विचारून घ्या. (फोटो: संग्रहित)
-
जर तुम्ही कर्ज काढून घर घेणार असाल तर कर्जाचा व्याजदर, कालावधी, ईएमआय याविषयी सविस्तर जाणून घ्या. (फोटो: Financial Express)
-
जर तुम्ही सेकंड हॅन्ड घर घेणार असाल तर प्रॉपर्टीची हस्तांतरण फी, इमारतीचे देखभाल शुल्क याविषयीचे नियम समजून घ्या. (फोटो: Financial Express)
-
घराची खरेदी करताना इमारतीचं ऑडिट सुद्धा तपासून पहा. प्रॉपर्टी रेल्वे किंवा महामार्गाच्या बांधणी क्षेत्रात आहे का हे सुद्धा तपासून घ्या. (फोटो: Financial Express)
-
जर इमारत जुनी असेल तर पुनर्बांधणीबाबत काही चर्चा सुरु आहेत का हे तपासून घ्या. (फोटो: Financial Express)
-
मूलभूत सुविधांविषयी विचारपूस करून घ्या. पाण्याच्या वेळा, इमारतीचे नियम आधीच जाणून घेणे फायद्याचे ठरेल. (फोटो: जनसत्ता)
-
तुम्ही ज्या ठिकाणी घर घेणार आहात त्या ठिकाणापासून बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, विमानतळ, मेट्रो, बाजार, शॉपिंग मॉल, शाळा, हॉस्पिटल किती दूर आहे हे तपासून पहा. (फोटो: Financial Express)
-
तुमचे शेजारी पहिले नातेवाईक असतात. त्यामुळे शेजार कसा आहे हे आधी तपासून पहा. वाटल्यास घर बघताना त्या बिल्डिंगमधील रहिवाश्यांशी संवाद साधा. (फोटो: Pixabay)
Flat Buying Tips: फ्लॅट, घर विकत घेताना ‘हे’ प्रश्न आधी विचारा; नाहीतर होईल डोक्याला ताप
Property Investment Hacks: जर घर घेताना विचारपूर्वक निर्णय घेतला नाही तर ही गुंतवणूक डोक्याला ताप ठरू शकते.
Web Title: Flat buying tips questions to ask before buying new property svs