-

अनेकदा पालक मुलांच्या प्रेमापोटी अशा काही चुका करतात, ज्याचा मुलाच्या वागण्यावर विपरीत परिणाम होतो. मुलाच्या संगोपनाच्या वेळी त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करणे टाळा. (Photo: freepik)
-
पालकांनी मुलांना सुरुवातीपासूनच विचारण्याची सवय लावावी. मोठ्यांना विचारण्याची सवय लावल्याने मुले सुसंस्कृत बनतात. (Photo: freepik)
-
अनेकदा जास्त लाड केल्यामुळे मुले बिघडतात. पण मुलाला त्याच वयात थांबवा. नातेसंबंध जपायला सांगा. मुलाच्या चुकांवर दुर्लक्ष करु नका. (Photo: freepik)
-
मुलांना मूल्ये शिकवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना मोठ्यांचा आणि लहानांचा आदर करण्यास शिकवा. त्यांना समजावून सांगा. (Photo: Pixabay)
-
आपल्या मुलांना वेळ द्या. त्यांना अभ्यासात मदत करा. बरेचदा लहान मुलं ओरडून बोलतात. त्यामुळे त्यांना रागावर नियंत्रण ठेवायला शिकवा. (Photo: Pixabay)
-
लहान वयात मुलांना शेअरिंग करणे शिकवा. आपल्या गोष्टी इतरांसोबत शेअर करणे हे सर्व मुलांमध्ये चांगले संस्कार घडवणारे गुण आहेत. (Photo: freepik)
-
मुलांचा संपूर्ण विकास करणं म्हणजे त्यांचा बौद्धिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक विकासही होणं आवश्यक आहे. (Photo: freepik)
-
मुलांना योग्य दिशा देण्यासाठी पालकांनी त्यांच्यासाठी वेळ खर्च करणे व त्यांचे मन जाणून घेणे आवश्यक आहे. (Photo: freepik)
-
वाढत्या वयाच्या मुलांचे खरे मित्र बनण्यामुळे त्यांचा उत्तम विकास होऊ शकतो. (Photo: freepik)
Photos : मुलांना सुसंस्कृत करायचंय्! ‘या’ टिप्स फॉलो करा…
प्रत्येक पालकाचे आपल्या मुलावर खूप प्रेम असते. आपले मूल सुसंस्कृत असावे अशी पालकांची नेहमीच इच्छा असते. पालकांनी लहानपणापासूनच मुलाला संस्कार आणि शिस्त शिकवली पाहिजे, जेणेकरून मूल एक आदर्श माणूस, एक चांगला मुलगा आणि यशस्वी नागरिक बनू शकेल. मुलाला सुसंस्कृत आणि शिस्तप्रिय बनवण्यासाठी पालकांनी काय करायला हवे ते जाणून घेऊया.
Web Title: Make children more sophisticated these tips will come in handy pdb