-
गर्भधारणेदरम्यान जर तुम्ही घरातील कामे करत असाल तर जास्त वेळ उभे राहून काम करू नका. थोडावेळ बसा आणि निवांतपणे काम करा.
-
गर्भधारणेदरम्यान घरातील पाळीव प्राणी कुत्रा किंवा मांजर असेल तर त्यापासून दूर राहा. प्राण्यांपासून संसर्ग होऊ शकतो.
-
कोणत्याही प्रकारची हार्श केमिकल्स बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.
-
स्वयंपाकघरच्या ओट्यावर भाज्या आणि फळं कापण्यापेक्षा टेबलचा वापर करून खुर्चीत बसून कापा.
-
गरोदरपणात घरकाम करण्यावर बंदी नाही, पण तुम्ही काही कामे आवश्यक टाळली पाहिजेत.
-
गरोदरपणात, विशेषतः पहिल्या तीन महिन्यांत कोणत्याही प्रकारच्या जड वस्तू उचलणे टाळावे.
-
गरोदरपणात तुम्ही गरम पदार्थांचे सेवन टाळावे. पहिले ३ महिने असे अन्नपदार्थ अजिबात खाऊ नका.
-
गरोदरपणात खूप वाकणे आणि पुसणं, कपडे धुणे, झाडू यासारखी कामं टाळावीत.
-
गर्भधारणेदरम्यान स्टूल किंवा शिडीवर चढणं खूप धोकादायक असते. (फोटो सौजन्य : Freeimages, Pixabay)
Photos: गरोदरपणात ‘ही’ कामं करणं अवश्य टाळा, अन्यथा…
गरोदरपणाचा काळ महिलांसाठी खूप अविस्मरणीय असतो. या काळात महिला अनेक गोष्टींचा अनुभव घेत असतात. या काळात महिलांनी स्वतःची विशेष काळजी घेतली पाहिजे. महिलांना त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये खूप सावधगिरी बाळगावी लागते. कारण असं केलं नाही तर तुमच्या आणि न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.
Web Title: Avoid doing these things during pregnancy otherwise it can cause great damage pdb