• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. from skin disease to diabetes dragon fruit is effective in many serious diseases pvp

Photos : ड्रॅगन फ्रूटचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हालाही माहित नसतील; त्वचा रोग ते मधुमेह, अनेक गंभीर आजारांवर गुणकारी!

ड्रॅगन फ्रूटमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स तसेच फ्लेव्होनॉइड्ससह अनेक गुणधर्म असतात, जे विविध गंभीर आजारांपासून आपले रक्षण करू शकतात.

October 6, 2022 11:54 IST
Follow Us
  • Dragon Fruit Health Benefits
    1/21

    ड्रॅगन फ्रूटचे शास्त्रीय नाव हिलोसेरास अंडस (Hiloceras Undus) असे आहे. हे फळ कमळासारखे दिसते, त्यामुळे या फळाचे संस्कृत नाव ‘कमलम्’ असे आहे.

  • 2/21

    हे फळ प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेत आढळते. तसेच, गुजरातमध्ये, कच्छ, नवसारी आणि सौराष्ट्र सारख्या भागांमध्ये ड्रॅगन फ्रूटचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

  • 3/21

    ड्रॅगन फ्रूटचे दोन प्रकार आहेत – एक पांढरा गर असलेले आणि दुसरा लाल गर असलेले.

  • 4/21

    ड्रॅगन फ्रूटमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स तसेच फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक अ‍ॅसिड, एस्कॉर्बिक अ‍ॅसिड, फायबर आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात.

  • 5/21

    मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यावर कोणताही ठोस उपचार ज्ञात नाही. तो आहार आणि जीवनशैलीत बदल करून नियंत्रित केला जाऊ शकतो. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर ड्रॅगन फ्रूट खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

  • 6/21

    ड्रॅगन फ्रूटमध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखी आवश्यक खनिजे असतात. ही खनिजे हाडांची रचना टिकवून ठेवण्यास मदत करतात.

  • 7/21

    पोटॅशियम आपल्या शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

  • 8/21

    जपानमधील शिगा युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सने केलेल्या अभ्यासानुसार, जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर पोटॅशियमयुक्त आहार घेतल्यास तुमचे हृदय आणि किडनी सुरक्षित राहण्यास मदत होऊ शकते.

  • 9/21

    ड्रॅगन फ्रूट शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते. यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात, जे व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

  • 10/21

    दात कमकुवत होण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही ड्रॅगन फ्रूटचे सेवन करू शकता. कारण त्यात कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत होण्यासही मदत होते.

  • 11/21

    ड्रॅगन फ्रूटमध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात, जे केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही चांगले मानले जातात. यामध्ये आढळणारे फॅटी अ‍ॅसिड केस निरोगी ठेवण्यास मदत करतात.

  • 12/21

    ड्रॅगन फ्रुटमध्ये कोलेस्ट्रॉल, तसेच फॅट्सचे प्रमाण अत्यंत कमी असते. म्हणूनच जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी या फळाचे सेवन करणे अतिशय फायदेशीर ठरू शकते.

  • 13/21

    ड्रॅगन फ्रुटमध्ये असलेल्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असतात जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.

  • 14/21

    ड्रॅगन फ्रूट हे फायबरचा एक चांगला स्रोत आहे. ते केवळ हृदयासाठीच नाही तर रक्तदाब आणि वजन नियंत्रित ठेवण्यासदेखील मदत करते.

  • 15/21

    ड्रॅगन फ्रूट हे ‘व्हिटॅमिन सी’चा चांगला स्रोत असल्याने, ते रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास, आहारातील लोह शोषण्यास शरीराला मदत करते. आपले दात निरोगी बनवते, तसेच त्वचा चमकदार आणि निरोगी बनवण्यास मदत करते.

  • 16/21

    तसेच, व्हिटॅमिन सी तुमची प्रतिकारशक्तीदेखील वाढवण्यास मदत करते. यामुळे आपण आजारी पडत नाही. डेंग्यूच्या रुग्णांना ड्रॅगन फ्रूट खाण्याचा सल्ला दिला जातो.

  • 17/21

    नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रूटचे सेवन खूपच गुणकारी आहे. कारण यामध्ये अनेक जीवनसत्त्वे आहेत.

  • 18/21

    आग्नेय आशियाई देशांतील प्राचीन सौंदर्य पद्धतींमध्ये ड्रॅगन फ्रुटचा वापर केला गेला आहे.

  • 19/21

    याच्या गराची पेस्ट बनवून ते चेहऱ्यावर नियमितपणे लावल्याने वृद्धत्वाची प्रक्रिया मंद होण्यास मदत होते आणि आपण तरुण दिसू शकतो.

  • 20/21

    तसेच, या पेस्टचा वापर मुरुम आणि सनबर्नवर उपचार करण्यासाठी देखील केला जातो.

  • 21/21

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : Pexels)

TOPICS
हेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: From skin disease to diabetes dragon fruit is effective in many serious diseases pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.