-
वाढते वजन व्यक्तीला नैराश्यात घेऊन जाते. एकदा वाढलेले वजन कमी करण्यासाठी कितीतरी मेहनत घ्यावी लागते.
-
सणांचे दिवस सुरू झाले आहे. या दिवसांमध्ये मिठाई, बाहेरचे पदार्थ, जंक फूड यांसारख्या गोष्टी खाल्ल्या जातात आणि वजन वाढते.
-
चरबीयुक्त पदार्थ, जंक फूड आणि साखरेचे जास्त सेवन हे वजन वाढण्याचे प्रमुख कारण असू शकते.
-
जे लोक जास्त प्रमाणात अन्न खातात, त्यांचे वजन खूप वेगाने वाढू लागते.
-
विशेषत: सणासुदीला मिठाईपासून जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळा.
-
जेवणानंतर गरम किंवा कोमट पाणी प्या.
-
अँटिऑक्सिडंट घटकांसाठी दिवसातून दोन ते तीन वेळा ग्रीन टी प्या.
-
वजन नियंत्रित ठेवायचे असेल तर कॅलरी युक्त पेयांपासून दूर राहा.
-
पॅक केलेले ज्यूस, सोडा, कोल्ड्रिंक्स इत्यादीपासून दूर राहा. हे पेय तुम्हाला नको असलेल्या कॅलरीज देतात, ज्यामुळे वजन वाढते.
-
वर्कआउट करून तुम्ही तुमच्या शरीराला परफेक्ट शेप देऊ शकता.
-
वर्कआउट हा एकमेव उपाय आहे जो तुम्हाला तुमचे वजन संतुलित करण्यात मदत करू शकतो.
-
तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर तुमच्यासाठी पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे. (फोटो सौजन्य : pixabay)
Photos : आली आली ‘दिवाळी’ आपलं वजन वाढवी! ‘या’ टिप्स पाळा आपलं ‘आरोग्य’ सांभाळा…
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. अनेकांना दिवाळी म्हटलं की वेध लागतात दिवाळी फराळाचे. जर तुम्हाला दिवाळीमध्ये पोटभर फराळ खायचा असेल पण तुम्हाला वजन वाढण्याचीही भीती आहे. म्हणून या सणासुदीच्या काळात वजन वाढू द्यायचे नसेल तर या टिप्स फॉलो करा.
Web Title: Try these effective tips to lose weight during festive season and stay healthy pdb