-
मेष: मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मी व गणेश पूजन करताना या राशीच्या व्यक्तींनी पूजेत गुलाबाचे फुल अर्पण करणे शुभ मानले जाते. दिवाळीत लाल रंग आपल्यासाठी शुभ ठरू शकतो.
-
वृषभ: वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. दिवाळीत या राशीच्या व्यक्तींनी निदान दिवेलागणीच्या वेळी ॐ महालक्ष्म्यै नमः या मंत्राचा जप केल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो अशी मान्यता आहे. वृषभ राशीसाठी दिवाळीत श्वेत म्हणजेच पांढरा रंग शुभ ठरू शकतो.
-
मिथुन: मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या व्यक्तींनी दिवाळीत लक्ष्मीसह गणेशाचे पूजनही मनोभावे केल्यास आशीर्वाद लाभतो अशी श्रद्धा असते. मिथुन राशीसाठी दिवाळीत चंदेरी रंग शुभ ठरू शकतो.
-
कर्क: कर्क राशीचा स्वामी स्वतः चंद्र असतो त्यामुळे दिवाळी सण या मंडळींसाठी शुभकाळ मानला जातो. कर्क राशीच्या व्यक्तीने दिवाळीत लक्ष्मी मातेला गुलाबी रंगाचे कमळाचे फूल अर्पण करणे शुभ मानले जाते. कर्क साठी शुभ रंग आहे लाल.
-
सिंह: सिंह राशीवर सूर्याचे स्वामित्व असते. दिवाळीत अभ्यंगस्नान झाल्यावर सूर्याला जल अर्पण करणे आपल्यासाठी फायद्याचे ठरू शकते. सिंह राशीसाठी शुभ रंग आहे केशरी.
-
कन्या: कन्या राशीच्या प्रभाव क्षेत्रात शुक्राचे गोचर शक्तिशाली असणार आहे, कन्या राशीच्या व्यक्तींनी लक्ष्मीला पांढरे कमळ अर्पण करणे फायद्याचे ठरू शकते. कन्या राशीसाठी शुभ रंग आहे सोनेरी.
-
तूळ: तूळ राशीत यंदा दिवाळी आधीच शुक्राचे गोचर झाले आहे. तूळ राशीच्या व्यक्तींनी माता लक्ष्मीला लाल रंगाचे फुल अर्पण करणे हिताचे ठरू शकते. तूळ राशीसाठी शुभ रंग आहे हिरवा.
-
वृश्चिक: वृश्चिक राशीत दिवाळीच्या दरम्यान मंगळ ग्रह शक्तिशाली असणार आहे. या दिवशी लक्ष्मी पूजनासाठी कुंकू अर्पण करणे पवित्र मानले जाते. वृश्चिक राशीसाठी शुभ रंग आहे जांभळा.
-
धनु: धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे, या राशीच्या व्यक्तींनी लक्ष्मीला पिवळे फूल अर्पण करावे. माता लक्ष्मीला चाफ्याचे फुल आवडते, धनु राशीसाठी शुभ रंगही आहे पिवळा.
-
मकर: मकर राशीमध्ये शनि देव स्थित आहेत, मकर राशीसाठी दीपावली अत्यंत शुभ ठरू शकते. लक्ष्मीसह शनिचे पूजन करणे लाभदायक ठरू शकते. मकर राशीसाठी शुभ रंग आहे निळा.
-
कुंभ: कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. दिवाळीत लक्ष्मी पूजनासह शनिपूजा करून ॐ शनैश्वराय नमः या मंत्राच्या जपाने शनिदेव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. कुंभ राशीसाठी शुभ रंग आहे गुलाबी.
-
मीन: मीन राशीवर गुरु ग्रहाची कृपा राहू शकते त्यामुळे हि दिवाळी तुमच्यासाठी शुभ ठरण्याचे योग आहेत. दिवाळीत लक्ष्मीपूजनाला तुळशीचे पूजन केल्यास भगवान विष्णूची कृपा राहते अशी मान्यता आहे. मीन राशीसाठी शुभ रंग आहे केशरी.
Diwali 2022: दिवाळीत तुमच्या राशीनुसार करा लक्ष्मी पूजन; धन, समृद्धी व प्रगतीचे जुळून येतील योग
Diwali 2022: येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला लक्ष्मी पूजन पार पडणार आहे, यानिमित्ताने गणेश पूजनही करण्याची प्रथा असते. दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मीपूजन करताना आपल्या राशीनुसार पूजा कशी करावी जाणून घ्या..
Web Title: Diwali 2022 lakshmi pujan shubh muhurat puja vidhi as per your zodiac signs laxmi mata mantra svs