Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. side effects of increasing screen time of children cashews almonds peanuts fish carrots vitamin c fruits these foods items improve childs eyesight pns

वाढत्या स्क्रीनटाइममुळे मुलांच्या दृष्टीची चिंता सतावतेय? डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणते खाद्यपदार्थ ठरतात उपयुक्त जाणून घ्या

November 5, 2022 18:41 IST
Follow Us
  • Side effects of increasing screen time of children Cashews Almonds Peanuts Fish Carrots Vitamin C Fruits these foods items improve childs eyesight
    1/15

    आजकाल प्रत्येक लहान मुलाचा मोबाईलचा वापर वाढला आहे. अनेक लहान मुलं तर मोबाईल नसेल तर जेवत सुद्धा नाहीत, त्यामुळे त्यांचा हट्ट नाईलाजाने पालकांना पूर्ण करावा लागतो.

  • 2/15

    पण या वाढलेल्या स्क्रिन टाइममुळे लहान मुलांच्या दृष्टीवर वाईट परिणाम होऊन त्यांची दृष्टी कमजोर होण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी लहान वयात देखील मुलांना चष्मा वापरावा लागत आहे.

  • 3/15

    मुलांच्या वाढत्या स्क्रिन टाइममुळे अनेक पालक चिंतेत असतात. यावर उपाय करण्यासाठी मुलांच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता, कोणते आहेत ते पदार्थ जाणून घ्या.

  • 4/15

    कठीण कवचाची फळे : कठीण कवचाची फळे – काजू, बदाम, शेंगदाणे ‘विटॅमिन ई’चे उत्तम स्रोत मानले जातात, त्यामुळे लहान मुलांनी याचे सेवन केल्यास त्यांची दृष्टी सुधारण्यासाठी नक्की मदत मिळू शकते.

  • 5/15

    यासह कठीण कवचाची फळे ‘मायोपिया’वरील घरगुती उपचारासाठी उत्तम पर्याय मानले जाते. मायोपिया म्हणजे दूरची दृष्टी अस्पष्ट होण्याची अवस्था.

  • 6/15

    काजू, बदाम, शेंगदाणे यांमध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड आढळते. ‘ओमेगा ३ फॅटी ऍसिड’मुळे डोळ्यांचा कोरडेपणा आणि डोळ्यांचे विकार कमी होण्यास मदत होते.

  • 7/15

    हिरव्या पालेभाज्या : हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, विटॅमिन ए, सी आणि बी १२ आढळते, जे दृष्टीसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

  • 8/15

    तसेच यामुळे मुलांमध्ये वाढत्या वयानुसार होणाऱ्या मोतीबिंदू आणि मॅक्युलर डिजनरेशन हे आजार रोखण्यास मदत करते. त्यामुळे मुलांच्या आहरात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.

  • 9/15

    मासे : माशांमध्ये देखील ओमेगा ३ फॅटी ऍसिड आढळते, जे लहान मुलांच्या रेटीनासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. तसेच हे डोळ्यांचे स्नायू मजबूत करण्यास आणि मेंदूच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.

  • 10/15

    गाजर : लहान मुलांची दृष्टी सुधारण्यासाठी गाजर फायदेशीर ठरते. यामध्ये बीटा कॅरोटीन आढळते, जे डोळ्यांच्या रेटीनासाठी फायदेशीर ठरते तसेच त्यामुळे सुर्यप्रकाशापासून संरक्षण मिळते.

  • 11/15

    स्ट्रॉबेरी आणि आंबट फळं : स्ट्रॉबेरी आणि संत्री, मोसंबी अशा आंबट फळांमध्ये ‘विटॅमिन सी’ भरपूर प्रमाणात आढळते.

  • 12/15

    ‘विटॅमिन सी’ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास सोबतच डोळ्यांना इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

  • 13/15

    (येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

  • 14/15

    (फोटो सौजन्य : Freepik)

  • 15/15

    (हे ही पाहा : Air Pollution: वायुप्रदूषणापासून वाचण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करतील मदत)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Side effects of increasing screen time of children cashews almonds peanuts fish carrots vitamin c fruits these foods items improve childs eyesight pns

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.