-
भाज्यांचे सूप : भाज्यांचे सूप आरोग्यासाठी फायदेशीर असते. हिवाळ्यात भाज्यांनी बनवलेले सूप प्यायल्याने शरीर उबदार राहते. सूप आजारांपासून बचाव करू शकते. भाज्यांचे सूप बनवताना त्यात काळी मिरी, दालचिनी आणि मीठ टाकले पाहिजे. (source – pixabay)
-
भाज्यांचे सूप बनवताना त्यात काळी मिरी, दालचिनी आणि मीठ टाकले पाहिजे. (source – प्रतिकात्मक)
-
गरम पेय : हिवाळ्यात थंडीपासून बचावासाठी तुम्ही गरम पेय पिऊ शकता. आल्याचा चहा प्यायल्याने देखील शरीरात स्फुर्ती येते. (source – freepik ) (source – )
-
तुळशी, आले आणि काळी मिरी सारख्या पदार्थांनी युक्त पेयांचे सेवन करता येऊ शकते. तुम्ही ड्रायफ्रुटयुक्त दुधाचेही सेवन करू शकता. (source – )
-
लाडू : गुळाचे लाडू शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात. उडीद आणि मूग गुळात मिसळून तुम्ही लाडू बनवू शकता. गुळ आणि तूप मिसळून तुम्ही सुक्या मेव्याचे लाडू बनवून त्याचे सेवन करू शकता. (source – pixabay)
-
आले : हिवाळ्यात सर्दी खोकला सारखे आजार होता. हिवाळ्यात आल्याचे सेवन करावे. आले रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करते. (source – संग्रहित)
-
सुका मेवा : सुका मेव्याने शरीराला प्रथिने, जीवनसत्व, खनिजे आणि फायबर मिळते. सुका मेवा मुळातच गरम असतो. त्यापासून मुबलक प्रमाणात उर्जा मिळते. तुम्ही हिवाळ्यात ड्रायफ्रुटचे सेवन करू शकता. (source – freepik)
-
तूप : हिवाळ्यात तुपाचे सेवन केले पाहिजे. तुपाने शरीर उबदार राहते. चपाती, भाजी आणि नाश्त्यामध्ये तूप टाकून खाल्ल्याने अशक्तपणा दूर होऊ शकतो. (source – )
-
मांसाहारी आहार : हिवाळ्यात मांसाहारी आहार फायदेशीर ठरू शकतो. मांसाहारी आहारातून प्रथिने आणि खनिजे मिळतात. मांसाहारी अन्न खाल्ल्याने शरीर बळकट होते. शाकाहारी असल्यास सोया, सुका मेवा आणि भाजीपाल्यांचे सेवन तुम्ही करू शकता. (source – संग्रहित)
हिवाळ्यात ‘या’ पदार्थांचे करा सेवन, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यात होईल मदत, शरीराला मिळेल ऊब
हिवाळ्यात थंडीमुळे आजार होण्याची शक्यता अधिक असते. या काळात गरम पदार्थांचे सेवन करून शरीर निरोगी ठेवता येऊ शकते. हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी पुढील पदार्थांचे सेवन तुम्ही करू शकता.
Web Title: Food to eat in winter to boost immunity and get warm ssb