-
‘नॉर्दन लाइट्स’ हा निसर्गाचा एक अद्भुत नमुना आहे. ही नैसर्गिक रोषणाई पाहण्यासाठी दरवर्षी हजारो-लाखो पर्यटक स्कॅन्डिनेव्हिया येथील नॉर्वे, स्वीडन, फिनलंड या देशांना भेट देतात.
-
‘नॉर्दन लाइट्स’च्या रोषणाईने आपले डोळे दिपून गेले तरी हा चमत्कार कसा घडतो याचे कुतूहल अनेकांना आहे.
-
हे लाइट्स आहेत तरी काय? कुठून येतात? कसे येतात? हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतातच. मात्र आज आपण या घटनेमागील शास्त्रीय कारण जाणून घेणार आहोत.
-
याच शास्त्रीय मूळ आहे आपल्या सौर यंत्रणेचा केंद्र बिंदू असलेला आपला सूर्य. आपल्याला माहीतच आहे की सूर्याचे तापमान १५ दशलक्ष डिग्री इतके आहे. (Pixabay)
-
हे तापमान कमी अधिक होत असताना सूर्याचा पृष्ठभाग उकळत असतो आणि याच प्रक्रियेत अनेक लहान मोठे कण अंतरिक्षात फेकले जातात.(Pixabay)
-
हे कण घेवून सोलार वारे सुमारे १५० दशलक्ष किमी प्रवास ४० तासांमध्ये करून पृथ्वीच्या कक्षेत येतात आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात आल्यानंतर पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हे कण दोन भागात विभागून उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाकडे फेकले जातात. (Pexels)
-
पृथ्वीवर असलेल्या वायूंसोबत मिसळल्याने या कणांना विविध रंग प्राप्त होतात आणि रंगीत ढग किंवा रंगीत लाइट्सच्या स्वरूपात ते आपल्याला दिसतात.
-
ऑक्सिजनबरोबर मिळून हिरव्या रंगाचे लाइट्स दिसतात तर नायट्रोजन मिसळल्याने जांभळा, लाल किंवा निळ्या रंगाचे तरंग तयार होतात.
-
यात उत्तर ध्रुवावर दिसणार्या या रोषणाईला ‘नॉर्दन लाईट्स’ किंवा अरोरा बोरेलिस (Aurora Borealis) म्हणतात तर दक्षिण ध्रुवावर दिसणार्या रोषणाईचा अरोरा ऑस्ट्रेलिस (Aurora Australis) म्हणतात.
-
हे लाइट्स कधीकधी अतिशय स्तब्ध पट्ट्यासारखे दिसतात तर कधी वेगात वाहणार्या अंतराळातील सौर वाऱ्यांमुळे हलताना दिसतात.
-
१६१९ साली गॅलिलिओ गॅलीली (Galileo Galilei) यांनी अरोरा बोरेलिस हे नाव दिले. यात अरोरा म्हणजे पहाटेची रोमन देवीचे नाव आणि ग्रीक मध्ये बोरेलिसचा अर्थ वारे असा होतो. या लाइट्सबाबत हजारो वर्षांपूर्वीच्या अनेक परिकथा, अंधविश्वास, अनुमान आजही प्रचलित आहेत.
-
नॉर्वेमधील ट्रॉम्सो हे आर्क्टिक क्षेत्रतील गाव जगभरात सर्वात सुंदर नॉर्दन लाइट्स दिसण्यासाठी सुप्रसिध्द आहे. याच गावात ९ नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजताच आकाशात किंचित फिक्या हिरव्या रंगाचीआकृती दिसू लागली. आकाशात हिरव्या रंगाचे तरंग दिसणे अत्यंत सामान्य आहे. मात्र यंदा आकाशात अत्यंत दुर्मिळ अशा गुलाबी रंगाची उधळण होत होती.
-
निळा, जांभळा, गुलाबी रंगांची जणू रंगपंचमीच आकाशात सुरू झाली. अवकाशात घडणाऱ्या सौर वादळांमुळे ही रंगांची तरंगे आकाशात सैरावैरा विहार करत आहेत, असेच भासत होते. हा दुर्मिळ क्षण प्रत्यक्ष अनुभवणे ही फारच मोठी बाब आहे.
-
तासभर चाललेला आकाशातील निसर्गरम्य विविध रंगांचा नजारा तिथे हजर असलेल्या प्रत्येकाने आयुष्यभरासाठी आपल्या आठवणींच्या कप्प्यात जपून ठेवावा असा होता.
-
अशा प्रकारचे सौर वादळे हे बर्याच मोठ्या कालावधीनंतर घडत असतात. काही वेळा दिवसाही ही रोषणाई दिसू शकते, पण मानवी डोळ्यांना ते सूर्य प्रकाशात सहज दिसू शकत नाही.
(सौजन्य : आत्माराम परब)
Photos : नयनरम्य ‘नॉर्दन लाइट्स’ची निर्मिती नक्की होते तरी कशी? पाहा ‘या’ निसर्ग सौंदर्याची झलक
‘नॉर्दन लाइट्स’च्या रोषणाईने आपले डोळे दिपून गेले तरी हा चमत्कार कसा घडतो याचे कुतूहल अनेकांना आहे.
Web Title: How are the picturesque northern lights create have a glimpse of natural beauty pvp