-
सफरचंद – टवटवीत त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही दररोज एक सफरचंद खा. दररोज एक सफरचंद खाल्ले तर नक्कीच तुम्ही अकाली वृद्ध दिसणे लांबवू शकता. यातील व्हिटॅमिन सी मुळे त्वचा आरोग्यदायी होऊन त्वचेला अकाली सुरकुत्या पडण्याचे प्रमाणही कमी होते. याशिवाय तुम्ही त्याचा फेसपॅक म्हणूनही वापर करू शकता.
-
संत्र्याचा रस – संत्र्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी असते. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. त्यात फायबर आणि पोटॅशियम असते. याच्या रोज सेवनाने त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. हे त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्याचे काम करते.
-
स्ट्रॉबेरी – स्ट्रॉबेरीमधील मॅलिक अॅसिड हा नैसर्गिक व्हाईटनिंग एजंट आहे. स्ट्रॉबेरीमध्येही अँटिऑक्सिडेंट हा घटक असल्यामुळे त्वचा निरोगी राहते.
-
चिया बिया – चिया बियांमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम दोन्ही भरपूर प्रमाणात असतात. एवढेच नाही तर त्यामध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि असंतृप्त फॅट्सही भरपूर असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. चिया बियांच्या वापरामुळे तुम्हाला खालील सौंदर्य फायदे मिळू शकतात.
-
हळद – हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटीफंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेची ऍलर्जी, फोड आणि मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करतात. हळदीचा वापर संवेदनशील त्वचेसाठी देखील प्रभावी आहे. हळदीची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावर ग्लो येतो, तसेच त्वचा निरोगी राहते.
-
आवळा – थंडीच्या दिवसांत आवळा भरपूर मिळतो. त्यामध्ये व्हिटॅमिन सी हे असते, तसेच अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्मही असतात. ज्यामुळे आपले रक्त शुद्ध होते. आवळा खाल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. तुम्ही आवळा कच्चा खाऊ शकता किंवा ज्यूस स्वरुपातही त्याचे सेवन करू शकता.
-
डाळिंब – डाळिंबामध्ये आयर्न म्हणजेच लोह हे भरपूर प्रमाणात असते. तसेच व्हिटॅमिन ई हेही असते. हे त्वचा चमकदार बनवण्यास मदत करते. डाळिंब खाल्याने शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होत नाही.
-
द्राक्ष – तुम्ही द्राक्षं स्वच्छ धुवून नुसती खाऊ शकता किंवा त्याचा ज्यूस करूनही पिऊ शकता. त्यामध्ये फ्लावोन्वाइनड असतात. द्राक्षांचे सेवन आपल्या त्वचेचे यूव्ही किरणांपासून (अतिनील किरणे) संरक्षण होते. द्राक्षांमुळे आपल्या त्वचेवर नैसर्गिक रित्या चमक येते.
-
पपई – त्वचेच्या काळजीसाठी आणखी एक अतिशय चांगला आहार म्हणजे पपई. जे तुमची त्वचा स्वच्छ आणि मुरुमांपासून मुक्त ठेवते. पपईमध्ये पपईन असते जे इतके प्रभावी आहे की ते त्वचेच्या मृत पेशी सहजपणे काढून टाकते.
-
काकडी – पाण्याने भरलेले अन्न आहे जे त्वचेसाठी खूप आरोग्यदायी आहे. ते तुमची त्वचा हायड्रेटेड आणि थंड ठेवते. हे तुमच्या त्वचेला सुरकुत्यापासून वाचवते आणि तुमची त्वचा घट्ट ठेवते.
-
टोमॅटो – टोमॅटोमध्ये अँटिऑक्सिडंट्स जास्त असतात आणि त्यात लाइकोपीन असते. त्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत होऊ शकते. यासाठी स्मूदीच्या स्वरूपात टोमॅटोचा आहारात समावेश करू शकता. चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल. तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये जाण्याचीही आवश्यकता भासणार
-
सूर्यफुलाच्या बिया – सूर्यफुलाच्या बियांमध्ये जस्त, सेलेनियम, खनिजे, फॅटी ऍसिडस् भरपूर प्रमाणात असतात जे त्वचेचे पोषण करतात. त्वचा मऊ आणि निरोगी बनवण्यासाठी हे सर्व घटक खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जर तुम्हाला नितळ त्वचा हवी असेल सू्र्यफुलाच्या बियांचा आहारात समावेश करा.
( फोटो सौजन्य : संग्रहित छायाचित्र )
Photos: सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी नववधूने आहारात करा ‘या’ फळांचा समावेश; लग्नात खुलेल तुमचे सौंदर्य
Skin Care: प्रत्येक मुलीला तिच्या लग्नाच्या दिवशी सुंदर दिसावे असे वाटते. त्यासाठी वधूच्या सौंदर्याचा डाएटही खूप महत्त्वाचा आहे. आजकाल लोकांमध्ये त्वचेशी संबंधित समस्याही खूप वाढल्या आहेत. मुरुम, टॅनिंग आणि डाग या सर्वात मोठ्या समस्या आहेत. त्यामुळे नववधूंनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यांनी अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा, ज्यामुळे त्यांना नैसर्गिकरित्या चमकदार त्वचा मिळण्यास…
Web Title: Brides should include these fruits in their diet for beautiful and glowing skin you will look more beautiful pdb