-
वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह आणि त्याच्या हालचालींना विशेष महत्त्व दिले गेले आहे. या वर्षातील दुसरा महिना फेब्रुवारी हा ग्रह संक्रमणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, फेब्रुवारी महिन्यात चार ग्रहांच्या राशींमध्ये मोठे बदल होणार आहे. सूर्य, बुध, शुक्र आणि शेवटी नेपच्यून हे ग्रह राशी बदलणार आहेत.
-
बुध ग्रहाने आज ७ फेब्रुवारीला मकर राशीत गोचर केलाय, ज्यामुळे बुधादित्य नावाचा विशेष योग तयार झालाय. हा योग काही राशींसाठी फायदेशीर ठरेल, परंतु या काळात काही राशींना विशेष काळजी घ्यावी लागेल.
-
सूर्य १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९:२१ वाजता कुंभ राशीत प्रवेश करेल. जेथे शनि आधीच शुक्राच्या संयोगाने उपस्थित असेल. १५ मार्च २०२३ रोजी सूर्य सकाळी ६:१३ पर्यंत कुंभ राशीत राहील आणि नंतर मीन राशीत प्रवेश करेल.
-
शुक्र १५ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी ७:४३ वाजता मीन राशीत प्रवेश करेल आणि १२ मार्चपर्यंत तिथेच राहील. फेब्रुवारी २०२३ चा चौथा संक्रमण १८ फेब्रुवारी २०२३ रोजी मीन राशीत नेपच्यूनचे संक्रमण असेल. जेथे शुक्र आणि गुरू आधीच उपस्थित आहेत. नेपच्यूनला “वरुण ग्रह” असेही म्हटले जाते.
-
फेब्रुवारी २०२३ मध्ये चार महत्त्वाचे ग्रह गोचर होणार असल्याने ५ राशींच्या लोकांचे भाग्य चमकणार आहेत. त्यांना नवीन संधी उपलब्ध होऊ शकते. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी..
-
मेष राशीतल लोकांसाठी ४ ग्रहांचे राशी बदल शुभ आणि फायदेशीर ठरू शकतात. या बदलामुळे या राशीतील लोकांना त्यांचे अडकलेले पैसे मिळू शकतात. यासोबतच त्यांना सुखप्राती होण्याचीही शक्यता आहे. तसंच तुम्ही या काळात वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करु शकता. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची चिन्हे आहेत. मात्र, यावेळी आरोग्याची काळजी घ्यावी लागणार कारण या परिस्थित तुम्ही तणावात जाण्याचाही शक्यता आहे.
-
फेब्रुवारी २०२३ मध्ये, ग्रह गोचर होणार असल्याने याचा लोकांवर वेगवेगळा परिणाम होईल. काही लोकांना वडिलोपार्जित मालमत्ता किंवा कौटुंबिक मालमत्ता मिळू शकेल, तर काहींना व्यवसायाच्या चांगल्या संधी असतील आणि त्यांची आर्थिक स्थिती चांगली असेल. तथापि, या काळात व्यापार करताना सावधगिरी बाळगा.सूर्याच्या प्रभावामुळे लोक त्यांच्या सामाजिक जीवनात अधिक यशस्वी होऊ शकतात.
-
कन्या राशीसाठी फेब्रुवारी महिना लाभदायक ठरू शकतो. जे विद्यार्थी सरकारी नोकरीची तयारी करत आहेत अशांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुमची रखडलेले काम पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला भावंडाचे सहकार्य मिळू शकते. तर व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
-
तूळ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना अनुकूल ठरु शकतो. या राशीतील ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. शिवाय व्यावसायिकांना नोकरी-व्यवसायाच्या संदर्भात प्रवास होऊ शकतो. या राशीतील विवाहित लोकांच्या जोडीदारासोबतच्या नात्यात सुधारणा आणि बळ येण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्ही मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांसह फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता.
-
कुंभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी हा महिना चांगला असू शकतो कारण शुक्र, सूर्य आणि बुध हे सर्व ग्रह अनुकूल असतील. तुम्ही तुमच्या भावनांवर आधारित चांगले निर्णय घेण्यास सक्षम व्हाल. तुम्ही तुमच्या कुटुंबासह तीर्थयात्रेला जाऊ शकता आणि धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. तुम्हाला अधिक उत्साही वाटेल आणि परदेशात व्यवसायात पैसे कमावण्याची संधी या काळात लाभू शकेल.
-
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)
फेब्रुवारी महिन्यात होणार चार महत्त्वाचे ग्रह गोचर; ‘या’ राशींना वर्षभर मिळू शकतो बक्कळ पैसा
February Horoscope 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी २०२३ मध्ये चार महत्त्वाचे ग्रह गोचर होणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. त्यांचे भाग्य चमकणार असून त्यांना अपार धनलाभ होऊ शकतो.
Web Title: February horoscope 2023 four major planet transit in feb these five zodiac sign can get huge amount of money pdb