-
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात. ज्याचा मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर परिणाम होतो.
-
मंगळ ग्रहाने १३ मार्च रोजी मिथुन राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे ‘विपरीत राजयोग’ निर्माण झाला आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला विशेष स्थान आहे. मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो.
-
मिथुन राशीतलं मंगळाचं हे संक्रमण सर्वच राशींसाठी प्रभावशाली असेल. मात्र, यातल्या काही राशी अशा आहेत ज्यांच्यावर मंगळ कृपा करेल.
-
काही राशींच्या लोकांना मंगळाच्या या राशी परिवर्तनाचा फायदा होणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
-
विपरीत राजयोग बनणे मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. कारण मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रहाने तृतीय भावात प्रवेश केला आहे. तृतीय घरात मंगळ शुभ फळ देतो. त्यामुळे यावेळी तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढेल.
-
विपरीत राजयोग तयार झाल्याने यावेळी तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. जे लोक प्रॉपर्टीचे काम करतात, त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.
-
विपरीत राजयोग बनल्यामुळे तुम्हाला चांगला धनलाभ होऊ शकतो. कर्क राशीच्या बाराव्या घरात मंगळाचे हे संक्रमण झाले आहे. त्यामुळे संपत्तीचे योग तयार होत आहेत. यावेळी तुम्ही लॉटरी जिंकू शकता.
-
तसेच यावेळी व्यावसायिकांना चांगली ऑर्डर मिळू शकते. ज्यामुळे प्रचंड नफा मिळू शकतो. तुमचा आदर वाढेल. व्यवसायात चांगले यश मिळू शकते. त्याचबरोबर या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.
-
विपरित राजयोग तयार झाल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. कारण मंगळ तुमच्या पारगमन कुंडलीतील सहाव्या घराचा स्वामी असून आठव्या भावात विराजमान आहे. म्हणूनच यावेळी तुमच्याकडे भरपूर पैसे येऊ शकतात.
-
यावेळी तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. परंतु दुखापत आणि अपघात होण्याची देखील शक्यता आहे, ज्यामुळे आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. दुसरीकडे, नोकरदार लोकांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.
-
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)
पाडव्यापूर्वीच ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ? ‘विपरीत राजयोग’ बनल्याने मंगळदेवाच्या कृपेने मिळू शकतो अपार पैसा
Mangal Planet Transit In Taurus: ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला विशेष स्थान आहे. मंगळ ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला असून त्यामुळे ‘विपरीत राजयोग’ निर्माण झाला आहे. यामुळे काही राशींसाठी धन व प्रगतीचे योग तयार झाले आहे.
Web Title: Mangal planet will make vipreet rajyog these zodiac signs to get huge money in bank balance marathi astrology pdb