-
ग्रहांची हालचाल आणि नक्षत्रांमध्ये वेळोवेळी वेगवेगळी स्थिती असते. या स्थितीला अवस्थाच्या रुपात ओळखले जाते. ग्रहांच्या पाच मूलभूत अवस्था आहेत.
-
यामध्ये बाल अवस्था, कुमार अवस्था, युवा अवस्था, वृद्धावस्था, मृत्यू अवस्था, यांचा समावेश आहे. जेव्हा कोणताही ग्रह युवावस्थामध्ये असतो तेव्हा तो शक्तिशाली असतो. त्यामुळे त्याचा अनुकूल परिणाम सर्वत्र दिसून येतो.
-
गुरू आणि शुक्र या दोन ग्रहांनी युवावस्थामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे याचा परिणाम सर्व राशींवर झालेला दिसून येईल.
-
पण अशा काही राशी आहे ज्यांच्यासाठी गुरु शुक्राची ही स्थिती फलदायी ठरू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी..
-
वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरु शुक्र यांची ही स्थिती खूप फायदेशीर ठरू शकते. तुमच्या कुंडलीत गुरु आणि शुक्र हे दोन्ही ग्रह अनुकूल स्थितीत आहेत. त्यामुळे याकाळात तुमची सर्व कामे यशस्वी होऊ शकतात.
-
ज्यांचे व्यवसाय परदेशाशी संबंधित आहेत त्यांना याकाळात चांगला फायदा होऊ शकतो. तसंच मागील गुंतवणूकी मधून तुम्हाला फायदा होण्याची शक्यता दिसत आहे. याकाळात तुम्ही एखादे वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता. एकंदरीत गुरु शुक्राच्या कृपेने तुमचे नशीब पालटू शकते.
-
गुरु शुक्राचा युवा अवस्थामध्ये प्रवेश कर्क राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरु शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे. गुरु शुक्र यांची ही स्थिती तुमच्या नवव्या घरात असेल, त्यामुळे तुम्हाला परदेशात प्रवास करण्याची संधी मिळू शकते.
-
तुमच्या राशीमध्ये मालव्य राजयोग तसंच हंस राजयोग देखील तयार होत आहेत. याकाळात तुम्ही धार्मिक कार्यास सहभागी व्हाल तसेच तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते. याकाळात तुमची सर्व कामे यशस्वी होतील, तसंच ज्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे त्यांच्या जीवनात लवकर समृद्धी दिसून येईल.
-
गुरु शुक्र यांची ग्रहस्थिती धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. मालव्य राजयोग आणि हंस राजयोग हे दोन शुभ योग देखील तुमच्या राशीत तयार होत आहेत. त्यामुळे याकाळात तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तसंच याकाळात तुम्ही एखाद्या शुभकार्यात सहभागी होऊ शकता.
-
नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरेल, तुम्हाला यावेळी पदोन्नती आणि पगार वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. तसेच तुमचा समाजातील मानसन्मान देखील वाढू शकतो. तुम्हाला याकाळात अचानक धनलाभ देखील होऊ शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते.
-
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)
शुक्र-गुरुदेवाचा युवा अवस्थेत प्रवेश; ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? मिळू शकते बक्कळ धनलाभाची संधी
Guru Shukra Yuva Avastha: गुरु शुक्र युवा अवस्थेत प्रवेश करणार आहेत. गुरु शुक्राचा प्रवेश होताच काही राशींच्या लोकांसाठी हे शुभ आणि फलदायी ठरू शकते. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
Web Title: Guru venus is going to enter in yuva avastha these zodiac sign get huge money bank balance marathi astrology pdb