-
आपल्याला बाहेर फिरताना तहान लागली की लगेच दुकानातून आपण पाण्याची बाटली विकत घेतो.
-
पाणी पिऊन झाल्यानंतर आपण ती एकतर कचऱ्यामध्ये फेकतो किंवा तिचा पुन्हा वापर करण्यासाठी घरी आणतो.
-
तुम्ही जर या बाटलीकडे निरखून पाहिले तर पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व प्लास्टिकच्या बाटल्यांवर तुम्हांला आडव्या रेषा दिसतील.
-
पण प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर रेषा का बनविलेल्या असतात, तुम्हाला माहिती आहे का?
-
आता त्या रेषा का असतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच, या रेषांमागे एक खास कारण आहे.
-
या रेषांचा प्लास्टिक बाटल्यांच्या डिझाईनमध्ये समावेश का केला जातो, याबाबत खूप कमी जणांना माहिती असेल.
-
पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांच्या डिझाईनमध्ये या आडव्या रेषांचा समावेश करण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. कोणते आहे ते कारण जाणून घेऊया.
-
पाण्याच्या बाटल्या हार्ड प्लास्टिकपासून बनवल्या जात नाहीत, तर पाण्याच्या बाटल्या बनवण्यासाठी हार्ड प्लास्टिकऐवजी मऊ प्लास्टिकचा वापर केला जातो.
-
त्यामुळे या रेषा नसतील तर या बाटल्या ने-आण करताना फुटू शकतात म्हणूनच एक संरक्षक आवरण म्हणून या रेषा पाण्याच्या बाटलीचं रक्षण करतात.
-
वास्तविक, बाटल्यांवर बनवलेल्या या रेषाही बाटलीच्या सुरक्षिततेसाठी आहेत. रेषा बाटल्यांवर नसतील तर बाटली तुमच्या हातातून निसटत राहील. बाटल्यांवर केलेल्या या ओळींमुळे, तुम्ही त्या बाटल्यांवर पकडू शकता.
-
अनेकांना वाटत फक्त डिझाईन म्हणून या रेषा आहेत तर असे नाही, सुरक्षितता हे त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे.
-
(फोटो सौजन्य : freepik)
तुम्ही विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्यांवर रेषा का बनविलेल्या असतात माहितीये? खरं कारण ऐकाल तर हैराण व्हाल
प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर रेषा बनविलेल्या असतात, त्या रेषा का असतात, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, या रेषांमागे एक खास कारण आहे.
Web Title: Do you know why plastic bottles have lines on the surface the reason is interesting pdb