-
वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. अशावेळी सोशल मीडियावर टिप्स देणाऱ्या अशा अनेक पोस्ट व्हायरल होणार हे साहजिकच आहे.
-
अशीच एक टीप म्हणजे पपई खा! पपई हे फळ अनेकांच्या आवडीचे आहे. पण सध्या व्हायरल होणाऱ्या ट्रिकमध्ये पपई खाल्ल्याने आठवड्याला दोन किलो वजन कमी होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
-
Indian_veg_diet नावाच्या पेजवर सांगण्यात आले की, “पपईच्या कमी कॅलरीजमुळे वजन कमी करण्यासाठी हे उत्तम फळ आहे. हे फळ फायबरचा एक चांगला स्रोत असल्यामुळे,तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटेल आणि अवेळी खाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. परिणामी, तुम्ही दिवसभरात कमी कॅलरीजचे सेवन करता”
-
पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, एखाद्याने आपल्या आहारात पपईचा समावेश केला तर आठवड्यातून दोन किलो वजन कमी होऊ शकते
-
याविषयी, पोषणतज्ज्ञ सुविधी जैन यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, पपई हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ आहे कारण त्यात प्रति १०० ग्रॅम फक्त ३२ कॅलरीज असतात
-
शिवाय हे जीवनसत्त्वे ए, सी आणि ई सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. तुमच्या आहारात पपईचा समावेश केल्याने तुम्हाला कमी कॅलरीजमध्ये पोषण मिळवता येऊ शकते.
-
पण, आहारात फक्त पपईचेच सेवन केल्याने वजन कमी झाले तरी निरोगी राहता येणार नाही. प्रथिने, कर्बोदके आणि चरबी यांचे योग्य प्रमाण असलेला संतुलित आहार राखण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
-
शिवाय हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की फळे असंख्य फायदे देतात, परंतु त्यात नैसर्गिक शर्करा असते
-
ज्यांना ब्लड शुगर, मधुमेह किंवा संबंधित त्रास आहेत त्यांनी फळांचे सेवन ठराविक मर्यादेतच करायला हवे
७ दिवस रोज पपई खाल्ल्याने दोन किलो वजन कमी होणार? डाएट पेजच्या दाव्याचं तज्ज्ञांनी सांगितलं गुपित
Weight Loss Papaya: पपईच्या कमी कॅलरीजमुळे वजन कमी करण्यासाठी हे उत्तम फळ आहे. हे फळ फायबरचा एक चांगला स्रोत असल्यामुळे,तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटेल पण..
Web Title: Eat papaya seven days loose two kilo weight in just a week with super diet funda health expert explain fats calories maths svs